शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा

By admin | Updated: May 21, 2017 02:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घरपोच प्रमाणपत्र, एसएमएस सुविधा आणि आॅनलाईन सातबारा अशा विविध सुविधा नागरिकांना

सचिन कुर्वे यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घरपोच प्रमाणपत्र, एसएमएस सुविधा आणि आॅनलाईन सातबारा अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नागपूरचे प्रशासन गतिशील बनविले आहे. कुर्वे यांच्या नेतृत्वात या आॅनलाईन सेवांच्या माध्यमातून नागपूरची डिजिटलकडे घोडदौड सुरू आहे. एटीएम मशीनसारख्या व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून दीड मिनिटात शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या यशस्वी उपक्रमाचे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना नागपुरात रुजू होऊन दोन वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्या या दोन वर्षाच्या कार्यकाळात नागपूरचे प्रशासन अतिशय गतीने काम करीत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार. ही योजना नागपुरात यशस्वीपणे राबविण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते. काटोल व नरखेड तालुक्यातील कामांचे कौतुक तर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. यासोबतच सावकारी कर्जमाफी, समाधान शिबिर, सातबारा संगणकीकरण, ड्रोनच्या माध्यमातून अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण यासारखे उपक्रम जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजना व आॅनलाईन सातबारा या उपक्रमात जिल्हा प्रशासनाच्या कार्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी घेतली. व्हेंडिंग मशीनच्या साह्याने सातबारा अवघ्या एक ते दीड मिनिटात मिळवून देण्याच्या उपक्रमाची दखल पंतप्रधानांनी नावीन्यपूर्ण योजना म्हणून केली. त्यांनी देशभरातील चांगल्या उपक्रमांचे एक पुस्तक प्रकाशित केले. त्यात नागपूरच्या सातबाराचा समावेश आहे. अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण नागपूर जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकरी सचिन कुर्वे यांनी आधुनिक ‘ड्रोन’चा वापर केला आहे. काही दिवसांसाठी हा पायलट प्रोजेक्ट म्हणून वापरला गेला. त्यानंतर तो कायम केला. या ड्रोनच्या वापराने जिल्हा प्रशासनाला बराच फायदा झाला. अनेक घाटांमधील रेतीचे अवैध उत्खनन उघडकीस आले. ड्रोनमध्ये चोरी चित्रीत झाल्याने सुनावणीदरम्यान प्रशासनाजवळ भक्कम पुरावाच असल्याने कुणीही यातून सुटू शकला नाही. अनेक वाळूचे लिलाव यामुळे रद्द करण्यात आले आहे. एकूणच या ड्रोनच्या वापरामुळे किमान वाळू उत्खननात पारदर्शकता आल्याचे दिसून येते. या ड्रोनचा वापर आता जलयुक्त शिवारच्या कामांसाठीसुद्धा केला जाऊ लागला आहे.