शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:30 IST

Online, Police, Nagpur News ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली होती. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. नागपूर पोलीसच नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारच होत नसल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे.

ठळक मुद्देवेबसाईटवर ऑनलाईनचे ऑप्शन पण रजिस्टरच होत नाही कम्प्लेंट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अडखळतो. ठाण्यामध्ये पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा लोकांसाठी पोलीस स्टेशन न गाठता, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली होती. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. नागपूर पोलीसच नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारच होत नसल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे.ऑनलाईन तक्रार करणे ही सुविधा फार सोपी आहे. ऑनलाईन तक्रारीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घ्यावी लागत असल्याने, कारवाई झपाट्याने होत असल्याचेही ऑनलाईन तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. नागपुरातील हेमंत गांजरे यांनी या सेवेचा लाभही घेतला आहे. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे गांजरे यांचे म्हणणे आहे. नागपूर पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे ऑप्शन आहे. परंतु तक्रार दाखल करण्यास हे वेबपेज उघडले तर समोर जात नाही. त्यामुळे तक्रार दाखल केली जाऊ शकत नाही. गांजरे यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालकांना ई-मेलवर तक्रार दाखल केली होती. महासंचालकांनी तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्त आणि डीसीपी इकॉनॉमिक यांना सूचना दिल्या होत्या. डीसीपी इकॉनॉमिक यांनी गांजरे यांना ऑनलाईन तक्रार सेवा सुरळीत झाल्याचे ई-मेलद्वारे कळविले होते. मात्र ही सुविधा अजूनही सुरळीत झालेली नाही.- जनतेसाठी सुविधाजनकएखाद्या पीडितावर दबाव वाढत असेल, पोलीस ठाण्यास जाण्यास त्याला भीती वाटत असेल तर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करता येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार जात असल्याने त्याची दखल तात्काळ होते. ऑनलाईन तक्रार सेवा सुरू ठेवणे ही जनतेसाठी सुविधा आहे, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस