नागपूर : आरटीईच्या २५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्ह्यात ७४१५ जागेसाठी सोमवारपासून आरटीईच्या आॅनलाईन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. २७ एप्रिलपर्यंत पालकांना आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. शिक्षण उपसंचालकांनी नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या तीनही जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. आरईटीसाठी जिल्ह्यात ६६६ शाळांनी नोंदणी केली आहे. पहिला वर्ग, नर्सरी, केजी १, केजी २ व प्ले स्कूल यासाठी ७४१५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्याने याकरिता ँ३३स्र:/६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करताना बालकांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज भरताना रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी पट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक राहील. वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अपंगत्व असल्यास जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेला. बालकाच्या जन्माचा दाखला व बालकांचे छायाचित्र रंगीत पासपोर्ट साईजचे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून आॅनलाईन फॉर्म भरताना जोडायची आहे. पालकांना अर्ज भरताना सोपे जावे म्हणून शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यात ५१ सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आॅनलाईन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेवर जिल्हा बाल कल्याण समितीचे नियंत्रण राहील. (प्रतिनिधी)आरटीई अॅक्शन कमिटीचीही पाच सेंटर्स४सीताबर्डी भिडे गर्ल्स हायस्कूलजवळ४गुरुनानक इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. सिव्हिल लाईन एमएलए होस्टेल४धरमपेठ क्रेडल टु क्रआॅन्स स्कूल४दाभा, प्राप्ती इंटरनेट, कुमार कॉम्पलेक्स४अलअमीन इंग्लिश स्कूल, जाफरनगर४हेल्पलाईन नंबर - ८७९६१२१२१३आरटीईअंतर्गत आरक्षित जागाएकूण जागा७४१५पहिला वर्ग ६७०९नर्सरी ५३७केजी११४५केजी२१८प्ले स्कूल ६
७४१५ जागेसाठी आॅनलाईन प्रवेश
By admin | Updated: April 18, 2016 05:16 IST