शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात किरकोळमध्ये कांदे ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:00 IST

Nagpur News, Onion, Market नागपुरात ठोक बाजारात आवक कमी असल्याने किरकोळमध्ये कांदे ६० रुपये किलो विकल्या जात आहेत. महागाईत कांद्याचा तडका महाग झाला आहे.

ठळक मुद्देकिरकोळमध्ये ६० रु. किलो

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाज्या आणि डाळींच्या किमती आकाशाला भिडल्यानंतर आता कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. ठोक बाजारात आवक कमी असल्याने किरकोळमध्ये कांदे ६० रुपये किलो विकल्या जात आहेत. महागाईत कांद्याचा तडका महाग झाला आहे.यंदा मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह अन्य राज्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक कमी असून जास्त भावात विक्री होत आहे. पांढरे कांदे फार कमी प्रमाणात येत आहेत. कळमन्यात ४० किलो (मण) कांद्याची किंमत १४०० ते १६०० रुपयांवर गेली आहे. त्यात दररोजच्या आवकीप्रमाणे भाववाढ होत आहे. सध्या ठोकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव ४० रुपये आहेत.भाववाढीमुळे आणि विक्री कमी असल्याने व्यापारी व अडतिया कांदे विक्रीसाठी बोलविण्यात नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कनार्टक आणि आंध्र प्रदेशात लाल कांदे पावसामुळे खराब झाले आहे. त्यामुळे आंधप्रदेशाच्या बाजारात दररोज होणारी ४०० ट्रकची आवक सध्या १०० ट्रकवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याशिवाय अकोला, बुलढाणा, नाशिक, पुणे या भागात कांद्याचे पीक खराब झाले आहे. निर्यात बंद झाल्यानंतरही स्थानिक बाजारात आवक वाढण्याऐवजी माल कमी प्रमाणात येत आहेत. त्याचाचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.या मोसमातील कांद्याचा साठा करता येत नाही. याशिवाय डाग असलेले कांदे लवकरच खराब होत असल्याने विक्रीअभावी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागते. मध्यप्रदेशातून विक्रीसाठी येणारे कांदे येणे बंद झाले आहे. बाजारात कांदे महाग झाल्यामुळे ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. सध्या रेस्टॉरंटमध्ये पार्सल सेवा सुरू असून ५ ऑक्टोबरपासून हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय बटाट्यांचीही आवक कमी असल्याने भाववाढ झाली आहे. बटाटेही ५० ते ६० रुपये किलो विक्री होत आहे.

 

टॅग्स :onionकांदा