शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:47 IST

सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत.

ठळक मुद्देमध्यम व हलक्या दर्जाची जास्त आवकआणखी भाव कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवड्यापासून कांदे शेतातून मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात येत असून राज्यातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, औरंगाबाद येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव २० ते ३० रुपये किलो कमी झाले आहेत. याशिवाय कळमना आलू-कांदे बाजारात पूर्वीपेक्षा आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात हलक्या व मध्यम दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ५५ रुपयादरम्यान आहेत.

उत्तम प्रतीचे १० टक्के तर मध्यम व हलक्या दर्जाची ९० टक्के आवककळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून आवक वाढल्यामुळे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांनी खरेदी कमी केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून कांद्याची उचल कमी आहे. त्याचाही परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. कळमन्यात दररोज २० ते २२ ट्रकची आवक आहे. त्यात उत्तम प्रतीचा कांदा केवळ १० टक्के येत आहे. उर्वरित कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. भाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी रात्री कांदा शेतातून काढून थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. चार दिवसांपासून सोलापूर बाजारात एकाच दिवशी ४०० ट्रक आले होते.एवढेच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातील बहुतांश कांदे खराब झाले. पुढे आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.

कळमन्यात दररोज २० ट्रकची आवकवसानी म्हणाले, आवक वाढली, पण लोकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. पूर्वी लागवड केलेले कांदे पावसाने खराब झाले. नंतरच्या लागवडीचे कांदे काही दिवसात बाजारात येणार आहे. त्याचा दर्जा चांगला राहील. शिवाय भावही कमी राहण्याची शक्यता आहे. इराण, इजिप्त आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. मुंबई बंदरात आवक वाढली आहे. सध्या औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि अहमदनगर येथून कांद्याची आवक आहे. भाव कमी झाल्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून आवक बंद झाली आहे.नंदनवन आठवडी बाजारातील कांदे विक्रेते दिलीप लिल्हारे म्हणाले, गेल्या आठवड्यात जास्त भावामुळे ग्राहकांनी कांदे खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे १५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कळमन्यातून खरेदी केलेल्या कांद्याला ग्राहक न मिळाल्यामुळे कांदे खराब झाले. अखेर फेकावे लागले. भाव स्थिर होईपर्यंत कांद्याऐवजी अन्य भाज्यांची विक्री सुरू केली आहे.बटाटे महागपावसाचा फटका बटाटे पिकाला फटका बसल्यामुळे आवक कमी झाली. परिणाम भाव वाढले आहेत. कळमन्यात १८ ते २० रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ३० रुपये भावाने विक्री होत आहे. छिंदवाडा येथून नवीन मालाची आवक आहे, शिवाय जुन्या बटाट्याची विक्री सुरू आहे. अलाहाबाद, कानपूर आणि उत्तर प्रदेशातील काही भागातून बटाट्यांची आवक जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. तोपर्यंत भाव कमी होणार नाहीत, असे वसानी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदा