शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:45 IST

शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला.

ठळक मुद्देशासन सेवेत सामावून घेण्यासाठी विधानभवनावर भव्य मोर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी मागील १६ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. शासन सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्यांची वयोमर्यादेची सेवा शासन सेवेत गेली. शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. सर्व शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा अशा घोषणा देऊन त्यांनी शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी रेटून धरली. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलनाला भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आवाज विधानसभेत उचलण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळास दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत २००३ मध्ये योजना सुरू झाली तेव्हापासून शासकीय पदभरतीच्या नियमानुसार कंत्राटी पदावर १३ ते १६ वर्षांपासून विविध पदांवर शासकीय सेवेत करार पद्धतीने कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना शासन सेवेत कायम करण्यात आलेले नाही. तुटपुंज्या मानधनावर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळे शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून ते विधान भवनावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरत आहेत. परंतु आजपर्यंत सातत्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समितीने यावर्षीही आपल्या मागणीसाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. मोर्चात सहभागी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली. आंदोलनानंतर कृती समितीचे प्रकाश आंबेकर, भाऊसाहेब नेटके, लक्ष्मीकांत पोटोडे, श्री टेकाडे यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची १५ वर्षांची सेवा झाली ही मोठी बाब असून शासन याबाबत गंभीर असून यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला.नेतृत्व : प्रकाश आंबेकर, लक्ष्मीकांत पोटोडे, भाऊसाहेब नेटके, श्री टेकाडे, रवींद्र इंगळे, सचिन देशट्टीवार, उमेश भरणे, वशिष्ठ खोब्रागडे, प्रफुल वासनिक, वनिता वंजारी, अभय सावंकर, अनिता ठेंगडी.मागणी : सर्व शिक्षा योजनेंतर्गत करार सेवेतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या.

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन