शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:52 IST

पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले.

ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले. २ मार्चला घडलेल्या या सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर गुरुवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.विक्रांत विजय टाले, रा. सिव्हिल लाईन्स असे तक्रारदाराचे नाव आहे. टाले हे न्यायालयात कर्मचारी असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. नोकरीच्या वेळेनंतर पार्टटाईम जॉब करून आर्थिक स्थिती चांगली बनवण्यासाठी त्यांनी स्वत:चा आणि आपल्या पत्नीचा अ‍ॅप्लिकेशन वजा रिझ्यूम नोकरी डॉट कॉम वर अपलोड केला होता. २ मार्चला त्यांना सागर सक्सेना नामक आरोपीने फोन केला. हिंगणा एमआयडीसी भागात पार्टटाइम जॉब उपलब्ध असल्याचे सांगून टाले यांना शाहिन इंडिया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगितले. तेथे २० रुपये रजिस्ट्रेशन फी भरायला सांगितली. २० रुपये जमा करताच त्यांच्या खात्यातून आरोपींनी २०२० रुपये काढून घेतले. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा आरोपीने चुकून दोन हजार रुपये जास्त काढून घेण्यात आल्याचे सांगून ते परत करतो. तुम्हाला मी ओटीपी नंबर पाठवतो, असे आरोपीने सांगितले. काही वेळानंतर आरोपीने टाले यांना ओटीपी नंबर विचारला. तो सांगताच सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९४० रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदविली. तब्बल साडेतीन महिने तपास केल्यानंतर सायबर शाखेने हे प्रकरण अंबाझरी पोलिसांकडे पाठवले. त्यानंतर फिर्यादी विक्रांत टाले यांची तक्रार नोंदवून एपीआय घोडके यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमjobनोकरी