शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 20:35 IST

शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ताधारकांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरही प्लॉटधारक न सापडल्यास थकबाकी असलेले प्लॉट जप्त करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.

ठळक मुद्देकर वसुलीला फटकामनपा कर थकीत असलेले प्लॉट जप्त करणारडिसेंबर अखेरीस १४० कोटींची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ताधारकांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरही प्लॉटधारक न सापडल्यास थकबाकी असलेले प्लॉट जप्त करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.२०१८-१९ या वर्षात मालमत्ता करापासून ५०९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. डिसेंबर अखेरीस १४० कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुली २५ कोटींनी अधिक असली तरी वित्त वर्षातील उद्दिष्ट विचारात घेता ती कमी आहे. आर्थिक वर्ष संपायला आता तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कर वसुलीसाठी तातडीने बैठकी घेण्याचे निर्देश दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोनच्या आढावा बैठका घेतल्या पाहिजे. सध्या दररोज २.४० कोटींच्या आसपास कर वसुली होत आहे. शिल्लक कालावधी विचारात घेता ती कमी आहे. दररोज ३.५० ते ४ कोटींची वसुली झाली तरच उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. वसुलीत सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.थकबाकीदारांच्या घरापुढे नगारा वाजविणारमालमत्ता कराच्या ३०० कोटींच्या थकबाकीपैकी ३३ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसुली व्हावी, यासाठी वसुली मोहीम राबविली जाणार आहे. यापूर्वी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरापुढे नगारा वाजविण्यात आला होता. गरज भासल्यास पुन्हा नगारा वाजविला जाईल. अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.मे पर्यंत एक लाख एलईडी लावणारडिसेंबर महिन्यात १६५०० एलईडी लावण्यात आले. जानेवारी महिन्यात २३ हजार एलईडी लावले जातील. फेब्रुवारीत १८ हजार तर मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी २० हजार असे एकूण १ लाख एलईडी लावण्यात येतील. असे निर्देश महापालिकेच्या विद्युत विभागाला दिल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.बाजार विभागाही वसुलीत मागेचबाजार विभागाने १३.७५ कोटींच्या डिमांड पाठविल्या आहेत. डिसेंबर अखेरीस विभागाची वसुली ४.२१ कोटींची झाली आहे. विभागाची वसुली कमी आहे. वसुलीत वाढ व्हावी. यासाठी दर महिन्याला आढावा घेतला जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर