शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:15 IST

नोकरीचे आमिष दाखवून सायबर टोळीने एका तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देबिर्ला कंपनीत रिक्त जागा असल्याचे सांगितलेमुलाखतीसाठी वेबसाईटवर रजिस्ट्रेशनही केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून सायबर टोळीने एका तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला.निशान अहमद मकबुल अहमद अंबर (वय २७) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोमिनपुऱ्यात राहतो. त्याने गेल्या वर्षी नोकरीसाठी आपली शैक्षणिक व इतर माहिती (रिझ्यूम) वेगवेगळ्या संकेतस्थळावर अपलोड केली होती. २९ सप्टेंबर २०१७ ला निशानला ९५४०२९९७३५ तसेच ९८९१६७६४९३ या क्रमांकावरून एका महिलेचे फोन आले. आपण अप्लाय नोकरी डॉट ईनमधून बोलतो, असे म्हणून त्या महिलेने निशानला बिर्ला कंपनीत रिक्त जागा असून, तेथे मुलाखतीसाठी आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. यावेळी महिलेने निशानचा दुसरा मोबाईल क्रमांकही मागून घेतला. त्यानंतर १०० रुपये आॅनलाईन रजिस्ट्रेशन चार्ज आपल्या खात्यात जमा करायला लावले आणि त्या आधारे निशानच्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतले. या प्रकरणाची तक्रार निशानने तहसील पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा