शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एक शेतजमीन दोघांना विकली; नागपुरात महिलेला दोन कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 10:41 IST

एकच शेतजमीन दोघांना विकून महिलेची दोन कोटीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिसांनी या प्रकरणात कामठीतील व्यापाऱ्यासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे व्यापाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकच शेतजमीन दोघांना विकून महिलेची दोन कोटीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिसांनी या प्रकरणात कामठीतील व्यापाऱ्यासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुमीत सुनील अग्रवाल, रा. कामठी, विमलाबाई मारोती सूर्यवंशी (७०), कमलाकर मारोती सूर्यवंशी (४२), हनुमंत मारोती सूर्यवंशी (४०), ज्योती कवडुजी तडवणकर (३८) रा. बुटीबोरी , राजुसबाई कमलाकर खुजवारे (३६) रा. धापेवाडा कळमेश्वर अशी आरोपीची नावे आहे. सूर्यवंशी परिवाराची कोराडी बोखारा येते साडेतीन एकर शेतजमीन आहे. रुपाली उमेश ढोक (३५) रा. सिद्धार्थनगर टेका यांनी या जमिनीचा सौदा केला. ढोक यांनी २४ जुलै २०१७ ते २५ मार्च २०१८ दरम्यान आरोपींना १ कोटी ९५ लाख रुपये दिले. आरोपींनी ढोक यांना जमिनीची रजिस्ट्री करून कब्जाही दिला. ढोक यांनी या जमिनीवर युनिक लॅण्ड डेव्हलपर्स नावाचा बोर्ड लावला. आरोपींना ढोक यांना काही दिवसानंतर सात-बारामध्ये फेरबदल करण्याचे आश्वासन दिले. परंतु काही दिवस उलटल्यानंतर आरोपी सात-बारात फेरबदल करीत नसल्याने फिर्यादीने तगादा लावला.परंतु सूर्यवंशी परिवार काही करायला तयार नव्हते. यातच सुमीत अग्रवाल मध्ये आले. त्यांनी ढोक यांचा बोर्ड हटवून स्वत:चा बोर्ड लावला. त्यांनी जमिनीवर अतिक्रमणही केले. त्यांचे म्हणणे आहे की. त्यांनी सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाकडून या जमिनीचा सौदा केला आहे. ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेला करारनामा दाखवित जमीन आपली असल्याचे सांगितले. यानंतर रुपाली ढोक यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्लॉट विकून ४६ लाखाची फसवणूकबोगस दस्तावेजाच्या आधारावर प्लॉट विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरुण धनंजय देशभ्रतार, राजेश दिलीपराव पंत, मुकुल वानखेडे, जितेंद्र छन्नालाल खजेरीया आणि त्यांचा एक साथीदार असे आरोपीचे नाव आहे. आरोपींनी बोगस व्यक्तीला उभे करून बेलतरोडी येथील रहिवासी आलेख शर्मा यांना प्लॉटची विक्री केली. त्या जागेवर घर बनवून देण्याचे आमिष दाखवून ४६ लाख रुपये वसूल केले. काही दिवसानंतर शर्मा यांना अपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचप्रकारे भीमरत्न आगलावे (५०) रा. उंटखाना दहीपुरा ले-आऊट यांनी २१ हजार रुपयात करारनामा करून प्लॉट विकत घेतला होता. आरोपी माणिकराव सोनवणे यांना प्लॉटची मोजणी करून मागितली असता आरोपी पळून गेला. आगलावे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी