शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील भांडेवाडी परिसरात सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:22 IST

कळमन्यातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या भाजले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचार गंभीर जखमी : परिसर हादरला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या भाजले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.पारडीजवळच्या भांडेवाडी परिसरात स्वागतनगर आहे. तेथील रहिवासी दत्तू लक्ष्मण हुरकुडे (वय ७०) हे एका विशिष्ट धार्मिक समूहाशी जुळले होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरात पूजा ठेवली होती. त्यामुळे त्यांचे आप्तस्वकिीय तेथे पोहचले. मोठ्या हॉलमध्ये पूजा सुरू असताना सिलिंडरचा स्फोट झाला. विशेष म्हणजे, जेथे पूजा सुरू होती तेथे पेट्रोलने भरलेल्या मोठ्या डबक्या होत्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात भाजून हुरकुडे, प्रकाश हुरकुडे (वय ३५), भाडेकरू हेमराज पडोळे (वय ३०), रोशन सदाशिव उके (वय २४), कुलदीप आणि धनराज नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी तेथे जमली. माहिती कळताच कळमना पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल बरडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तोपर्यंत सर्व जखमींना मेयोत नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी दत्तू हुरकुडे यांना मृत घोषित केले. दरम्यान, तेथे सिलिंडरचा स्फोट झालाच नाही, तशी अफवा होती. पेट्रोलच्या डबक्या जवळ असल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या आजूबाजूच्यांनी आम्हाला सांगितले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकरी बरडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आजूबाजूच्या मंडळींनी मात्र सिलिंडरचा स्फोट झाल्याचेच सर्वांना सांगितले .मेयोमध्ये चार जणांवर उपचारभांडेवाडी येथे झालेल्या सिलिंडरच्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच जणांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारासाठी आणले असता यातील एकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जणांवर उपचार सुरू आहेत. यात रोशन उके (२७), प्रकाश उरकुडे (३८), हेमराज (३०), कुलदीप (२०) यांच्यावर सर्जिकल कॉम्प्लेक्समधील जळीत वॉर्डात उपचार सुरु आहे. हे सर्व रुग्ण ४० ते ६० टक्के जळाले असून कुलदीप याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.