शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेच्या ‘त्या’ ६६ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:26 IST

नागपूर महानगरपालिकेच्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांनी ‘कारणे द्या’ नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे.

ठळक मुद्देनोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी अचानक पाहणी केली असता ६६ कर्मचारी ड्युटीवर उशिरा आल्याचे आणि सूचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आले होते. या कर्मचाऱ्यांनी ‘कारणे द्या’ नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयातील वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पाहणी केली होती. या विभागातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नसल्याचे निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर काही कर्मचारी रजेवर होते. चौकशी केली असता त्यांनी रजेचा कुठलाही अर्ज दिलेला नव्हता अथवा त्यांच्या रजेला पूर्वपरवानगी नव्हती.

तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी उशिरा येण्याला सुरुवात केली होती. मात्र राधाकृष्णन बी. यांनी एकाच वेळी ६६ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने. लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.झोन कार्यालयातही कारवाईची गरजमहापालिकेच्या दहा झोनमधील कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुख्यालयाप्रमाणे झोन कार्यालयातील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.शिस्त न पाळल्यास कारवाईकार्यालयात वेळेत उपस्थित होणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. त्यात कुठलीही कसूर चालणार नाही. त्यामुळे मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका