शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या जरीपटक्यातील फायरिंग प्रकरणात एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:14 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत.

जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील (२७) हा रविवारी रात्री मिसाळ ले-आऊट मधून इकोकारने घराकडे येत होता. वैशाली स्कूलजवळ दहा ते पंधरा तरुण दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते. पाटीलने दुचाकी बाजूला घ्या, म्हटल्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींकडे शस्त्र असल्याचे पाहून पाटील आपल्या घराकडे निघाला. त्याचा पाठलाग करून दहा ते बारा आरोपी हुडको कॉलनीतील पाटीलच्या घरी धडकले. ते आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्यामुळे पलाशचा भाऊ प्रीतेश (२६) समोर आला. त्याने आरोपींना जाब विचारताच एकाने पिस्तुलातून दोन ते तीन फायर केले. त्यातील एक गोळी भिंतीवर आदळून प्रीतेशला लागल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर तलवार, चाकू, कुकरी घेऊन आरोपींनी हैदोस घातला. दुचाकीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. मोठ्या संख्येत आजूबाजूचे नागरिक गोळा झाल्यामुळे आरोपी पळून गेले. दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्यापूर्वीच आरोपी पळून गेले होते. जखमी प्रीतेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पुनेश ठाकरे, मनोज कहाळकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. आज आरोपी कहाळकर पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ यांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याचा १९ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.जखमीची प्रकृती धोक्याबाहेरया प्रकरणातील फिर्यादी पलाश राजू पाटील आणि त्याचा भाऊ (जखमी) प्रीतेश भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. सोबतच ते पोलीस दलात भरती होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत. जखमी प्रीतेशची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.सर्वत्र खळबळक्षुल्लक कारणावरून फायरिंग झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सोमवारी जरीपटका ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती घेतानाच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंबंधीची निर्देश दिले. पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर