शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

चार लाखांत दीड किलो सोने : आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:47 IST

चार लाखांत दीड किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करू पाहणाऱ्या एका आरोपीचा डाव सौरभ मनोज झा (वय १९) नामक तरुणाने उधळला. सौरभच्या सतर्कतेमुळेच लकडगंज पोलिसांनी आरोपी लखन धर्मा राठोड (वय २५, रा. माथनी, मौदा) याच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले.

ठळक मुद्देफसवणुकीचा प्रयत्न उधळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार लाखांत दीड किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करू पाहणाऱ्या एका आरोपीचा डाव सौरभ मनोज झा (वय १९) नामक तरुणाने उधळला. सौरभच्या सतर्कतेमुळेच लकडगंज पोलिसांनी आरोपी लखन धर्मा राठोड (वय २५, रा. माथनी, मौदा) याच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले.फिर्यादी सौरभ गरोबा मैदानाजवळच्या आदर्शनगर गल्लीत राहतो. तो आणि त्याचे काका भैयालाल शिवकुमार झा (वय ५५) ३ मार्चला रात्री भाजीपाला घेण्यासाठी लकडगंजमधील जनता हॉलजवळ आले होते. तेथे त्यांना आरोपी राठोड भेटला. त्याने सौरभला बाजूला नेले. आम्हाला खोदकामात मोठ्या प्रमाणावर सोने सापडले आहे असे सांगून चार लाख रुपयात दीड किलो सोने देतो, असे राठोड म्हणाला. तुला सोने घ्यायचे असेल तर दोन दिवसांनी भेट, असेही तो म्हणाला. त्यानुसार, ५ मार्चला सौरभने आरोपी राठोडची भेट घेतली. त्याने सोने घ्यायची तयारी दाखवताच आरोपीने सौरभला सोन्याचे दोन मनी देऊन ते खरे की खोटे त्याची शहानिशा करण्यास सांगितले. त्या बदल्यात राठोडने सौरभकडून एक हजार रुपये अ‍ॅडव्हॉन्सही घेतला. दुसऱ्या दिवशी सौरभने सोन्याच्या मन्यांची सराफांकडून शहानिशा करवून घेतली. ते खरे असल्याचे सराफाने सांगितले. मात्र, चार लाखांमध्ये दीड किलो सोने कुणी कसे देणार, हा प्रश्न सौरभला सतावत होता. आमिष दाखवणारा राठोड ठगबाजी करीत असावा, असा संशय आल्याने सौरभने त्याला ७ मार्चच्या रात्री ८ वाजता सोने घेऊन येण्यास सांगितले. इकडे लकडगंज पोलिसांनाही माहिती दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी रात्री ८ वाजता लखन राठोड सौरभला भेटला. त्याने चार लाख रुपये आणले काय, अशी विचारणा केली. सौरभने हो म्हणत त्याला सोने दाखवायला सांगितले. राठोडने दागिन्याची पिशवी दाखवताच सौरभने बाजूला घुटमळणाºया पोलिसांना इशारा केला. त्याचवेळी लकडगंज पोलिसांनी गराडा घालून राठोडला जेरबंद केले.सतर्कतेमुळे डाव उलटलाआरोपी राठोडने सोने म्हणून एक पिवळ्या धातूची एक किलो वजनाची माळ आणली होती. ती सौरवला देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये हडपण्याचा त्याचा डाव होता. मात्र, सौरभच्या सतर्कतेमुळे तो फसला.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक