शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कधी होता पार्लरचा मालक, आता धुतो कप बशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 11:15 IST

crime news Nagpur News पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

ठळक मुद्देटोळक्याने आणले रस्त्यावरलोभाने केले कंगाल

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

आज त्याच्यावर हॉटेलमध्ये कपबशी धुण्याची वेळ आली. आमिष कुणाला, कसे रस्त्यावर आणून सोडते, त्याचा नमुना ठरू पाहणारी ही घटना आहे. या घटनेतील पात्र अमरावती अमरावती शहरातील रहिवासी आहे.

२०१४ पर्यंत या व्यक्तीचे शहरात पॉश आइस्क्रीम पार्लर होते. अकोल्यातील ओळखीच्या एका आरोपीने त्याला मुंबईत अल्प किमतीत कस्टमचे सोने मिळते, इच्छा असेल तर पाहायला चल. नंतर घ्यायच की नाही ते ठरवू, असे म्हटले. पात्र तयार झाले. ऑगस्ट २०१४ मध्ये हे मुंबईला पोहोचले. जाळे लावून बसलेल्या टोळक्याने पात्राला सोने दाखवले. एअरपोर्टवर कस्टम विभाग जे सोने जप्त करते, त्यातील काही अलगद काढून काढून घेतले जाते. हे सोने आम्हाला अत्यल्प किमतीत मिळते आणि ते आम्ही कमी किमतीत विकतो, असे सांगितले गेले. सोने असली की नकली ते तपासून बघा,असेही सांगण्यात आले. सोन्याची तपासणी झाली आणि ते अस्सल असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पात्राला लोभ सुटला. पात्र अमरावतीला परतले आणि इकडचे तिकडचे सर्व विकून, कर्ज काढून २७ लाख रुपये गोळा केले. सहा लाख मित्राकडून घेतले. ३३ लाख रुपये घेऊन पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. टोळी सज्ज होती. सोने मोजून-मापून हातात देण्यात आले. अर्ध्या किंमतीत सोने मिळण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढे मोठे सोने एकट्याने मुंबईहून अमरावतीला नेणे योग्य होणार नाही, त्यासाठी आमची माणसं सोबत न्या, असा सल्ला त्यांनी दिला. टोळक्याच्या सल्ल्यानुसार टॅक्सी करून ही मंडळी मुंबईहून अमरावती कडे निघाली. ज्याच्याकडे सोन्याची बॅग होती, तो वाटेत गायब झाला. टोळीतील इतर सदस्यांनी ''आमच्या माणसाने आमच्याशी दगाबाजी केली'', असा कांगावा केला.

दीड महिन्यानंतर पात्राला पुन्हा फोन आला. सोने घेऊन पळालेला माणूस सापडला, मुंबईत या आणि सोने घेऊन जा, असेही म्हटले. त्यामुळे पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. पुन्हा चार-पाच जण कथित सोने घेऊन अमरावतीकडे निघाले. भुसावळजवळ खाकी वेशातील चौघांनी त्यांना पकडले आणि त्याच व्यक्तीला सोने तस्करीच्या आरोपात ताब्यात घेऊन निघून गेले. पोलिसांचा छापा पडला. त्यामुळे आता आम्ही काही करू शकणार नाही, असे सांगून टोळक्याने हात झटकले. दरम्यान, चार-पाच दिवस निघून गेले. पोलिसांच्या छाप्याची आणि सोने जप्तीची बातमी एकाही वृत्तपत्रात न आल्यामुळे पात्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने टोळक्यावर संशय घेऊन फसवणुकीचा आरोप लावला. पोलिसांकडे जाण्याची धमकीही दिली. त्यामुळे टोळक्याने त्याला कसेबसे शांत करून तुझी रक्कम तुला परत करतो, असे म्हटले. नोव्हेंबर २०१५ मध्ये आमचा बॉस नागपुरात राहतो, तुम्ही या आणि रक्कम परत घेऊन जा, असे म्हटले. ठरल्याप्रमाणे पात्र नागपुरात पोहोचले. त्याला कुख्यात संतोष आंबेकरच्या बंगल्यावर नेण्यात आले. तेथे त्याची बेदम धुलाई करून पिस्तूल दाखवण्यात आले. जिवंत राहायचे असेल तर सगळं विसर, असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. होते नव्हते ते सारेच गमावले आणि कर्जदारांचा तगादा सुरू झाला. रस्त्यावर आलेले पात्र जीव लपविण्यासाठी दुसऱ्या राज्यात निघून गेले. तब्बल पाच वर्ष मिळेल ते काम करत त्याने पोटाची व्यवस्था केली.

दरम्यान, नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केल्याचे वृत्तपत्रातून त्याला कळले. त्यामुळे पात्र नागपुरात पोहोचले. त्याने पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याची चौकशी होईल आणि पुढे जे काही व्हायचे ते होईल. मात्र कमी किंमतीत सोने विकत घेण्यासाठी होते नव्हते सर्व विकून संतोष आणि साथीदाराच्या हातात आयुष्यभराची कमाई ठेवल्यामुळे पात्र अगदीच कंगाल झाले आहे. दोन सांजेची सोय करण्यासाठी सध्या हे पात्र एका हॉटेलमध्ये चहाच्या कपबशा धूत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी