शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अबब! विष्णू मनोहर यांनी शिजविली १५०० किलो भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:20 IST

नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

ठळक मुद्देपुन्हा एक नवा विक्रम सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. विष्णू यांनी हा भव्य उपक्रम कुठल्याही विक्रमासाठी केला नाही, तर नागपुरकरांना विषमुक्त अन्न मिळावे, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सेंद्रिय उत्पादनाची चव नागपूरकरांना व्हावी, या उद्देशातून १५०० किलोची भाजी शिजविली.बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे सकाळी ६.३० वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा करून त्यांनी भाजी शिजवायला सुरुवात केली. सखे सोबती फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दीड हजार किलो भाजी शिजेल एवढी मोठी कढई, १० फुटाचा सराटा, शेकडो किलो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मसाले, खाद्यतेलाचा वापर करून चार तासात त्यांनी भाजी शिजविली. हे सर्व प्रीपरेशन गोवºया आणि लाकडांवर करण्यात आले. विष्णू यांनी केलेल्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. १० वाजताच्या सुमारास भाजी तयार झाली. आमदार गिरीश व्यास, मनसेचे प्रवक्ते हेमंत गडकरी, राजे मुधोजी भोसले यांच्या उपस्थितीत उपस्थितांना त्याचे वितरण करण्यात आले.अनेकांनी विष्णू यांनी तयार केलेल्या भाजीचा आस्वाद घेतला, काही कुटुंबीयांसाठीही घेऊन गेले. विष्णू यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि धन्यवादही दिले.सर्वकाही नैसर्गिकदीड हजार किलोच्या भाजीत १२० किलो गांजर, १७५ किलो बटाटे, १०० किलो कांदे, अद्रक, लसूण, मिरची प्रत्येकी ५० किलो, १०० किलो सांभार, १०० किलो कोबी, १०० किलो वांगे, टोमॅटो १५०, मेथी २५ यासह मसाले व १५० किलो खाद्यतेलाचा वापर करण्यात आला होता. ‘फार्म २ फ्रीज’ या संस्थेकडून सर्व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्यात आला होता.खूप टेस्टी झालीविष्णू यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्व खवय्येगिरीच्या उपक्रमात आम्ही सहभागी होतोे. त्यांनी केलेली खिचडी, हलवाही खाल्ला. त्यांच्या हातची भाजीही खूपच टेस्टी झाली आहे. जे काही भव्यदिव्य ते करताहेत, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे आणि आम्हालाही त्यांच्या हातचे खायला मिळत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी केलेला हा उपक्रम अभिमानास्पद आहे.-वृषाली दारव्हेकर

टॅग्स :foodअन्नVishnu Manoharविष्णु मनोहर