शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:45 IST

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले.

ठळक मुद्देअंजू बॉबी जॉर्जने केले मत व्यक्त राष्ट्रकुल व विश्व स्पर्धेच्या तुलनेत ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या उदघाट्नसाठी अंजू रविवारी नागपुरात आली होती.पॅरिसमध्ये २००३ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये कांस्यपदक पटकावण्याचा इतिहास घडविणारी अंजू पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली,‘राष्ट्रकुल व विश्व चॅम्पियनशिपच्या तुलनेत ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये पदक पटकावणे भारतासाठी सोपे नाही. ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा असतो.’याबाबत कारण विषद करताना अंजू म्हणाली,‘तुम्हाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. तुम्हाला देशात अधिक ट्रॅक व सुविधांची गरज आहे.सध्या येथील सुविधा पुरेशा नाहीत. आपले ज्युनिअर खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करीत आहेत. आपल्याकडे विश्वविक्रमी भालफेकपटू आहे. त्यामुळे आपल्याला सध्याच भाकीत करता येणार नाही.’उदयोन्मुख खेळाडू १८ वर्षीय हिमा दासबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘अल्प वेळात हिमाने बरेच काही मिळवले आहे. तिच्यावर दडपण यायला नको.’अंजूने प्रतिभावान युवा खेळाडू शंकरचीही प्रशंसा केली. तो क्रीडा पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातील आहे. त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने कसून मेहनत घेण्याची गरज आहे.डोपिंगबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘डोपिंग दुसरे तिसरे काही नसून गुन्हा आहे. डोपिंगच्या दुष्परिणामांबाबत खेळाडूंना शिक्षित करायला हवे. मलाही डोपिंगाची झळ बसली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांना दोष देण्यापेक्षा खेळाडूंनी स्वत:च माहिती करुन घ्यायला हवी.’बेंगळुरूमध्ये अ‍ॅथ्लेटिक्स अकादमी चालवित असलेल्या अंजूने भारतीय प्रशिक्षकांना अधिक प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानी राहिलेल्या अंजूने भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची प्रशंसा करताना आता खेळाडूंसाठी शिबिर व स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे म्हटले.क्रिकेटच्या तुलनेत कार्पोरेट जगताकडून अ‍ॅथ्लेटिक्सला मदत मिळत नसल्याचे सांगताना ऑलिम्पिक पदक मिळवता न आल्याचे शल्य असल्याचे अंजूने सांगितले.नागपुरात सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवीअंजू सध्या टॉप्सची (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम) अध्यक्ष व खेलो इंडिया प्रोजेक्टची कार्यकारी सदस्य आहे. नागपूरने लांब पल्ल्याचे चांगले धावपटू दिले असले तरी येथे सुविधांची वानवा आहे. अंजू म्हणाली,‘नागपूर लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचसोबत सरकारच्या सहकार्याने येथे सुविधांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे.’

टॅग्स :cultureसांस्कृतिक