शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

कळमन्यात वृद्धाचा खून

By admin | Updated: June 20, 2014 01:05 IST

कळमना मार्केटच्या बसस्थानकात आज सकाळी एका वृध्दाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात थरार निर्माण झाला. अक्तू पुनाराम शाहू (वय ६५) असे मृताचे नाव आहे.

आरोपी अज्ञात : परिसरात थरार नागपूर : कळमना मार्केटच्या बसस्थानकात आज सकाळी एका वृध्दाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात थरार निर्माण झाला. अक्तू पुनाराम शाहू (वय ६५) असे मृताचे नाव आहे. त्याचा परिवार गुलमोहोरनगरातील पटले किराणा स्टोर्सजवळ श्रावण शाहू यांच्या घरी भाड्याने राहातो. कळमना मार्केटच्या गेट नंबर २ जवळ बसथांबा आहे. बस थांब्याच्या शेडमध्ये आज सकाळी १० च्या सुमारास अक्तू शाहूंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. अक्तूचा मुलगा आनंद कळमना मार्केटमध्ये चहा टपरी लावतो. माहिती कळताच तो घटनास्थळी पोहचला. वडिलाच्या चेह-यावर आणि पोटावर धारदार शस्त्राचे घाव होते. त्याने पोलिसांना कळविले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त संजय दराडे हेदेखिल घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेहाची पाहाणी केल्यानंतर मृताच्या मुलांकडे चौकशी केली. वडिलांसोबत बुधवारी रात्री ८ वाजता आपले बोलणे झाले होते. त्यांना जेवायला घरी चलण्यास सांगितले. त्यांनी नंतर येतो, असे सांगितल्यानंतर आपण निघून गेलो, त्यानंतर आज सकाळी ही घटना उघड झाल्याचे त्यांनी म्हटले. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वृद्ध अक्तूचा खून कुणी आणि कशासाठी केला असावा, त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)