शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जुन्या पुस्तकांची बाजारपेठ उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 10:31 IST

८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासनाची टोलवाटोलवी पर्यायी जागेसाठी आता अधिवेशनावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला. व्यवसायासाठी सर्व जुन्या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जुन्या पुस्तक विक्रेत्यांना देण्यात आले होते. परंतु आता प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी या पुस्तक विक्रेत्यांपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील जागेत तब्बल ८५ वर्षांपासून जुन्या पुस्तकांचा बाजार भरत होता. हा बाजार म्हणजे नागपूरची ओळख झाला होता. या बाजारातील पुस्तकांच्या विक्रीवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. परंतु मेट्रो रेल्वेने हा आधारच हिरावला आहे. या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळावी, यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता.शहराच्या विकास कामासाठी येथील पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाची जागा दिली. तेव्हा प्रशासनानेही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. तेव्हा पर्यायी जगा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी आता पुस्तक विक्रेत्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने पावसाळी अधिवेशनादरम्यान ७ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.आता आम्ही जगायचे कसे?मेट्रोच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुन्या पुस्तक विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपली जागा सोडली. परंतु आता पुस्तक विकेत्यांसह दुकानात काम करणाऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी जागा द्यावी.- नरेश वाहाणे, अध्यक्ष,नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था

 

टॅग्स :Governmentसरकार