शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे काही परीक्षा केंद्रांवर तर विद्यार्थ्यांनी जुन्याच प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत.यंदा ‘बीबीए’ प्रथम सत्राचा अभ्यासक्रम बदलविण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. सोबतच जुन्या अभ्यासक्रमानुसार ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचाही पेपर होता. सकाळी ९.३० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील १७ ते १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. नवीन आणि जुन्या पेपरचा विषय सारखाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चूक लक्षात आलीच नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही तफावत लक्षात आली व तत्काळ त्यांनी ही बाब परीक्षा केंद्र अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत परीक्षा भवनातदेखील कळविण्यात आले.परीक्षा भवनातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर जुन्या व नवीन अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे एक ते दीड तासांनी प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आल्या, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय होणार ?दरम्यान, दोन परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना जुन्या व नव्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकेतील तफावत लक्षातच आली नाही. त्यामुळे त्यांनी नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असूनदेखील जुनीच प्रश्नपत्रिका सोडविली. संबंधित विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परत परीक्षा घेण्याची मागणी केली. यासंदर्भात अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निर्णय घ्यावा लागेल, असे डॉ.खटी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा