शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बाप रे ! दोन महिन्यात रेल्वेत ८० हजार फुकटे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:25 IST

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देनागपूर विभागातील आकडेवारी : ३.९२ कोटी दंड केला वसूल

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल केला.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांच्या नेतृत्वात आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक एच. के. बेहरा यांच्या निरीक्षणाखाली विना तिकीट प्रवाशांविरुद्ध अभियान राबविले. यात १ एप्रिल ते ३१ मे महिन्यापर्यंत विनातिकीट आणि सामानाची नोंद न केलेल्या ८० हजार ६३२ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मे महिन्यात ३६ हजार ६३४ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख ५३ हजार दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत २९ हजार १३२ फुकट्या प्रवाशांकडून १ कोटी १२ लाख ६४ हजार दंड वसूल करण्यात आला होता. १ एप्रिल ते मे २०१८ मध्ये विनातिकीट प्रवास करणाºया १६ हजार ३५४ फुकट्या प्रवाशांकडून ९७ लाख ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर मे महिन्यात ८ हजार ३९० प्रवाशांकडून ५१ लाख २९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल ते मे २०१८ पर्यंत ७५ हजार ८४७ अनियमित तिकीट धारक आणि सामानाची नोंद न करणाºया प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ कोटी ८९ लाख ९५ हजार दंड वसूल करण्यात आला. मासिक तिकीट धारकांनी आरक्षित डब्यातून प्रवास न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विनातिकीट प्रवास करणे हा दंडात्मक आणि सामाजिक गुन्हा असून प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी