शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अधिकारी रजेवर, गुन्हेगार कामावर !

By admin | Updated: May 27, 2015 02:51 IST

‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले.

गुन्हेगाराचा थयथयाट : सर्वसामान्य दहशतीत नरेश डोंगरे नागपूरपोलीस अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्याचे नाव घेतले जात नसतानाच अनेक ठाणेदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही सुट्यांवर गेल्यामुळे उपराजधानीत गुन्हेगारांनी थयथयाट सुरू केला आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, जबरी चोऱ्या, घरफोड्याच नव्हे तर बलात्कार, सामूहिक बलात्कार अन् विनयभंगांच्या घटनांनी या आठवड्यात सर्वसामान्यांसोबत पोलीसांमध्येही खळबळ उडवून दिली आहे. गेल्या सात दिवसात अचानक गुन्हेगारी उफाळून आली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, घरफोड्या, जबरी चोऱ्या, बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात अचानक वाढ झाली आहे. अवघ्या १७ तासात खुनाच्या तीन घटना घडल्या तर, आठ दिवसांच्या कालावधीत प्राणघातक हल्ल्याच्या १० घटना घडल्या. एकाच दिवशी कळमन्यात पेट्रोल पंपावर आणि प्रतापनगरात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याकडे पिस्तुलाच्या धाकावर करण्यात आलेल्या लुटमारीसह एकूण १० लुटमारीच्या घटना घडल्या. प्रतापनगर आणि इमामवाड्यातील सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांसह बलात्काराच्या एकूण सात घटना घडल्या. याच कालावधीत विनयभंगाच्या १० घटना पोलीस ठाण्यात नोंदल्या गेल्या. घरफोडी, चोरी, फसवणूक, खंडणी वसुलीचे गुन्हे वेगळेच आहे. उफाळलेल्या या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दुसरीकडे शहरातील इमामवाडा, सदर, सक्करदरा, जरीपटकासह अनेक ठिकाणचे ठाणेदार, एसीपी आणि दोन डीसीपी, जॉर्इंट सीपी सुटीवर गेले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यासाठी आवश्यक साधन सुविधा उपलब्ध असताना गुन्हेगारीने उसळी मारण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जात आहे.गुन्हेगारांकडे पोलिसांचे दुर्लक्षनागपूर : ‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले. पोलीस अधिकाऱ्यांची रजा, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनास्था तसेच निष्क्रियता आणि बाहेरच्या गुन्हेगारांकडील दुर्लक्ष हे काही प्रमुख मुद्दे अधोरेखित झाले. बाहेरच्यांवर दुर्लक्ष हवे !उपराजधानीतील ४ लाख गुन्ह्यांचा डाटा शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला असून, प्रत्येक गुन्हेगारावर नजर ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पहिल्याच आठवड्यात सांगितले होते. मात्र, ३० लाख लोकसंख्येच्या उपराजधानीत रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांपैकी किती जणांवर पोलिसांची नजर आहे, ते कळायला मार्ग नाही. बाहेरून येणारे अनेक जण व्यसनाधिनतेमुळे किंवा पैशाच्या लालसेपोटी गुन्हेगारीकडे वळतात. रोजगारांच्याच नव्हे तर शिक्षणाच्याही नावाखाली आलेलेही अनेक जण गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे यापुर्वी उघड झालेले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर नजर रोखल्यास अनेक गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो. शिवाय, पुढे घडू पाहणाऱ्या गुन्ह्यांनाही आळा घातला जाऊ शकतो. पोलीस दलातही अस्वस्थताउफाळलेल्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकारीही अस्वस्थ आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी मनुष्यबळ, चांगली अन् पुरेशी वाहने तसेच सुविधा देऊनही गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अपयश का येत आहे, त्याबाबत पोलीस दलात जोरदार मंथन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी सोमवारी सर्व ठाणेदारांचा क्लास घेतला. मंगळवारी सकाळपासूनच पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्या दालनात दुपारपासून सायंकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली तर, त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांची प्रदीर्घ बैठक झाली. गुन्हे आणि पोलिसांची भूमिका यावर अधिकाऱ्यांनी चिंतन केले. (प्रतिनिधी)