शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार, सुप्रिया सुळें यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या  आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात खळबळआरोपी गजाआड

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या  आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. वालचंद्र गिट्टे असे आरोपीचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो सुरेंद्रनगरात राहतो.१५ नोव्हेंबरच्या रात्री ११.३१ ते ११.५० या वेळेत आरोपी वालचंद्र गिट्टे याने आपल्या ट्विटरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले. दुसऱ्या  दिवशी ते लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जगदीश पंचबुद्धे आणि नागपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल कामळे यांनी प्रारंभी गुन्हे शाखेत आणि नंतर नंदनवन ठाण्यात धाव घेतली. प्रदीर्घ मंथनानंतर नंदनवन पोलिसांनी १६ नोव्हेंबरच्या रात्री भादंविचे कलम ५०० व ५०९ तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी यासंबंधाने बरीच गुप्तता पाळत चौकशी चालवली. त्यानंतर आज सकाळी आरोपी वालचंद्र गिट्टे याचा पत्ता शोधून त्याच्या मुसक्या बांधल्या.विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नंदनवनमधील काही कर्मचारी सायंकाळी सांगत होते तर, रात्री ९ वाजेपर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे पोलीस ठाण्यातून काही कर्मचारी सांगत होते.

 

 

टॅग्स :Twitterट्विटर