शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ऑड- ईव्हन समाप्त : व्यापाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 02:22 IST

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मागील काही महिन्यापासून नागपूर शहरात व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलेला ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्दे दुभाजक असलेल्या मार्गावर दुकाने सुरू ठेवण्याला अनुमती सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ पर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील अरुंद रस्त्यावरील ऑड- ईवन कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मागील काही महिन्यापासून नागपूर शहरात व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलेला ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील व्यापारी ऑड - ईवन समाप्त करण्याची मागणी करीत होते.रस्ता दुभाजक असलेल्या सर्व मार्गावरील ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील दुकाने सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येतील. मात्र ऑड- ईवन समाप्त करताना ठेवण्यात आलेल्या अटी व शर्ती मुळे या घोषणेचा लाभ सरसकट सर्व व्यापाऱ्यांना मिळालेला नाही. महाल इतवारी व सीताबर्डी यासारख्या बाजारपेठात प्रमुख रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने व रस्ते अरुंद असल्याने या भागात ऑड- ईवन कायम राहणार आहे.ज्या मार्गावर रस्ता दुभाजक आहे. रस्ते रुंद आहेत, अशाच मार्गावरून व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने वर्धा मार्ग, गोकुळ पेठ,सदर, मानेवाडा रोड, सक्करदरा, भंडारा मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, मेडिकल चौक परिसर, कामठी रोड यासह रस्ता दुभाजक असलेल्या मोठ्या रस्त्यांवरील व्यावसायिकांचा समावेश आहे..इतवारी व महाल भागातील व्यापाऱ्यांना लाभ नाहीशहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारी व महाल परिसरातील रस्ते अरुंद असल्याने येथील व्यापाऱ्यांना ऑड- ईवन समाप्त करण्याचा त्याचा लाभ होणार नाही. अशीच परिस्थिती अरुंद रस्ते असलेल्या भागातील आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त