शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

निमित्त : संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:23 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी करून आजवर संमेलनाध्यक्ष पदाला लागलेल्या टीकेच्या गालबोटावरून लिंबलोण उतरून टाकलं आहे हे नक्की !

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सुकन्या डॉ. अरुणा ढेरे यांनी वडिलांचा वारसा अतिशय समर्थपणे जपला आहे. त्यांनी आजवर कथा, कविता, कादंबरी, ललितबंध, संशोधन, संपादन, लोकसाहित्य, चरित्रलेखन असे अनेक प्रकार लीलया हाताळले असले तरी त्यांची ठळक ओळख आहे ती कवयित्री म्हणूनच! पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत या कवयित्रींच्या पुढच्या काळाची कविता अतिशय ताकदीने लिहिली ती अरुणा ढेरे यांनी! मात्र तरी ती आपल्या पूर्वसुरींचा प्रभाव मिरवणारी नाही तर त्यांची स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारी ठरली. अरुणा ढेरे यांचं ललितलेखन ज्याप्रमाणे अगदी समोरासमोर बसून जिव्हाळ्याच्या गप्पा केल्यासारखं सहज आणि सुंदर आहे त्याचप्रमाणे त्यांची कविता आहे. एखाद्या मनस्विनीने कॅनव्हासवर आपल्याच तंद्रीत कुंचला चालवावा किंवा आषाढातल्या मध्यरात्री तानपुऱ्यावर एखादी तीव्रोत्कट बंदिश गावी तशी कविता. त्या भरजरी कवितेला, तापलेल्या सतारीच्या तारेने नकळत बोट कापावं तसा दुखून सुखावल्याचा तलम पोत आहे. तिच्यात उपजत समजूत आहे. नख लावणं नाही, विखार नाही, बोचकारणं नाही. आकांत आहे पण कर्कश्शपणा नाही. मात्र स्पष्ट भूमिका आहे. सूक्ष्म निरीक्षण आहे.शोक करावा साऱ्यांनी असा नसतो प्रसंगफक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो ...ही अतिशय संवेदनशील अभिव्यक्ती आहे.माझ्या मित्रा, अनय, शैशवतारा, मायबाई या कवितेतून मानवी नातेसंबंधांवरचा त्यांचा विश्वास वारंवार दिसतो आणि कवितेतून त्यातल्या सौन्दर्यासह वाचकापुढे येऊन उभं रहातं.हसतो आपण मनातल्या मनातमनातल्या मनात आपल्याला शोधून दमलेल्याजगातल्या शहाण्या पुरुषालाअन आपल्याला तसलं हसता येतं हेही तो जाणत नाहीमनात आणलंच तरजग हसून पेटवू शकतो आपणपण तसलं काही आपण मनातही आणत नाही !आपण किती ओळखतो एकमेकींना ?ही कॅथार्सिसची अनुभूती देणारी कविताही त्यांचीच. म्हणूनच कदाचित वाचकाला ती आपली, स्वत:ची वाटू लागते. शब्द या अभिव्यक्ती माध्यमावर कमालीचा जीव आहे त्यांचा आणि त्या शब्दाबद्दल एक कुतूहल देखील त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच मंत्राक्षर या कवितासंग्रहात एक स्वतंत्र विभागाच या कवितांचा आहे. कलावंताला शब्द कसा भेटतो? त्यांची अनेक रूपं त्यात सापडतील.सांप्रतच्या काळात इतक्या ताकदीच्या कवयित्रीने अध्यक्षपदावर विराजमान व्हावं ही खरंच काळाची गरज होती. कविता सोपी नाही. ती समाज माध्यमांवर टिचकी मारावी तितकी सहज साध्य नाही हे कळायला हवं आहे नव्याने लिहिणाऱ्यांना!अरुणा ढेरे तर स्पष्ट म्हणतातचचूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळीतेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी !माधवी भट

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठी