शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील  मनसर-खवासा रोडवरील ‘मिटिगेशन मेजर्स’वर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:14 IST

सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘मिटिगेशन मेजर्स’ अंतर्गत विविध लांबीचे अंडरपासेस बांधण्यात आले असून त्यांच्या उंचीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अंडरपासेसची उंची नियमानुसार पाच मिटर नाही असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांना यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : ‘एनएचएआय’ला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘मिटिगेशन मेजर्स’ अंतर्गत विविध लांबीचे अंडरपासेस बांधण्यात आले असून त्यांच्या उंचीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अंडरपासेसची उंची नियमानुसार पाच मिटर नाही असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांना यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. निखिल पाध्ये यांनी अंडरपासेसच्या उंचीवर आक्षेप घेऊन याची चौकशी करण्याची मागणी केली. मनसर ते खवासा रोडचा विकास करण्यासाठी व अंडरपासेस बांधण्यासाठी काढण्यात आलेली माती नदी व नाल्यांमध्ये टाकण्यात आली आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोताला बाधा पोहोचली आहे असेदेखील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. परिणामी, न्यायालयाने ‘एनएचएआय’ला यावरही उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणातील मध्यस्थ माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयroad safetyरस्ते सुरक्षा