शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढतेय वाहनांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाकडे वेगाने अग्रेसर असलेल्या नागपूर शहरात लोकांचे राहणीमानदेखील बदलताना दिसून येत आहे. नवीन वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. २०१३ सालापासून शहरात ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत शहर ‘आरटीओ’ला थोडाथोडका नव्हे तर ३०१ ...

ठळक मुद्देसाडेचार वर्षांत ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी : कराच्या माध्यमातून शहर ‘आरटीओ’ला ३०१ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाकडे वेगाने अग्रेसर असलेल्या नागपूर शहरात लोकांचे राहणीमानदेखील बदलताना दिसून येत आहे. नवीन वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. २०१३ सालापासून शहरात ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत शहर ‘आरटीओ’ला थोडाथोडका नव्हे तर ३०१ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. यातील ७६ टक्के महसूल हा नवीन वाहनांच्या नोंदणीतून मिळाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ‘आरटीओ’कडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात किती नवीन वाहनांची नोंदणी झाली व त्यांच्यापासून किती कर मिळाला, वंशनिमय या बस कंपनीने किती कर भरलेला नाही, किती वाहनचालकांपासून कर वसूल होऊ शकलेला नाही, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, या कालावधीत शहर ‘आरटीओ’त ८२ हजार ४२४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. याच्या करापोटी ‘आरटीओ’ला २३१ कोटी ८३ लाख ८४ हजार ८२० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. दरम्यान, १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत‘आरटीओ’ला विविध करांच्या माध्यमातून मिळालेला एकूण महसूल हा ३०१ कोटी ५८ लाख ९४ हजार ५९५ रुपये इतका होता.दरम्यान वंशनिमय या बस कंपनीने १० बसेसचा कर भरलेला नाही. थकीत कराबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे, असे उत्तरात नमूद आहे.३५ लाखांच्या कराची वसुली नाहीदरम्यान, या कालावधीत २०६ वाहनधारकांनी ‘आरटीओ’चा कर थकविला आहे. कराची रक्कम ही ३५ लाख ९३ हजार ७८८ इतकी आहे. ही वसुली अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान, वेळेवर कर न भरणाºया वाहनचालकांना दर महिन्याला २ टक्के व्याजाप्रमाणे दंड आकारण्यात येतो, असे ‘आरटीओ’ने स्पष्ट केले आहे.