शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाचणी केंद्रांची संख्या वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 23:42 IST

कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या केंद्रांवर चाचणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. सध्या ३४ केंद्रावर चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या केंद्रांवर चाचणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. सध्या ३४ केंद्रावर चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी दिली.कोरोनाचे संकट मोठे आहे. मागील काही दिवसात नागपूर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सोबतच मृत्यूची संख्याही वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असून तो वाचावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजार वाढण्याची प्रतीक्षा न करता लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत. कोविडमुळे दगावणाऱ्यात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचा विचार करता महापालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी आॅक्सिजन लेव्हलची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येणाºया पथकाला सहकार्य करावे. नागरिकांना वेळीच उपचार मिळावेत. त्यांचा जीव वाचावा यासाठी ही मोहीम हाती घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली.गर्दी असलेल्या सेंटरची क्षमता वाढविणारकाही केंद्रावर चाचणीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे अशा केंद्रांची क्षमता वाढविली जाईल. यासाठी औषध यंत्रणा उभारण्यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिले जातील. तपासणीसाठी येणारा कोणताही रुग्ण परत जाणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे, असा विश्वास राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.‘लाईव्ह अ‍ॅप’वरील तक्रारी सोडविणारमहापालिकेच्या लाईव्ह अ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारी यापुढेही सोडविल्या जातील, परंतु सध्या कोविड-१९ चे संकट मोठे आहे. नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, यावर मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. विविध बाबींचा आढावा घेत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच आर्थिक स्थितीत सुधारणा व विकासाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त