शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पॉश भागांमध्ये कुंटणखाने : सेक्स वर्कर्सच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:27 IST

उपराजधानीतील वारांगनांची वस्ती म्हटले की गंगा जमुनाचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आता ‘सेक्सवर्कर्स’चे जाळे शहरात सर्वच ठिकाणी पसरले आहे. शहरातील ‘सेक्सवर्कर्स’चे प्रमाण दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे.

ठळक मुद्देकसे येणार नियंत्रण ?

मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील वारांगनांची वस्ती म्हटले की गंगा जमुनाचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आता ‘सेक्सवर्कर्स’चे जाळे शहरात सर्वच ठिकाणी पसरले आहे. शहरातील ‘सेक्सवर्कर्स’चे प्रमाण दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे. विशेष म्हणजे या ‘सेक्सवर्कर्स’ शहराच्या आत राहून व्यवसाय करत आहेत.‘लोकमत’ने शहरातील विविध संस्था तसेच ‘सेक्सवर्कर्स’साठी ग्राहक आणणाऱ्यांशी संपर्क साधला. नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर त्यांनी माहिती पुरविली. अनेक महिला स्वत:ची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे शरीरविक्रयाकडे वळतात. तर काही महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायात आणले जाते. समाजाच्या दृष्टीने त्या अगदी सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचा मूळ व्यवसाय हा शरीरविक्रय हाच असतो. मागील १० वर्षांपासून शहरात शरीरविक्रय करणाऱ्या एका महिलेने तर धक्कादायक माहितीच दिली. नागपूरसोबतच बाहेरील शहरांमध्येदेखील हे जाळे पसरले असून नव्या मुलींना चक्क प्रशिक्षणदेखील देण्यात येते. ‘सेक्सवर्कर’ म्हणून काम करत असताना ओळख नेहमीच लपविल्या जाते. महाविद्यालयात शिकणाऱ्या काही मुलीदेखील शरीरविक्रय करतात व पैशांच्या लोभापायी त्या इकडे वळतात. आमच्यासोबत किंवा हाताखाली काम करणाऱ्या मुलींची खरी नावेदेखील आम्हाला माहीत नसतात, असे तिने सांगितले. यासंदर्भात ‘सेक्सवर्कर्स’साठी काम करणाऱ्या ‘भारतीय आदिम जाती सेवक संघ’च्या किरण निनावे यांना संपर्क केला असता शहरात हे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात ‘सेक्सवर्कर्स’ची संख्या जवळपास दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण वेगाने वाढत असून तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. आमच्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही या महिलांशी संपर्क साधतो व त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करतो. १९ समन्वयकांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो. त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करणेदेखील कठीण असते, असे त्यांनी सांगितले.

‘सेक्सवर्कर’चा मुलगा झाला अभियंतायावेळी एका ‘सेक्सवर्कर’ची कहाणी तर शहारे आणणारी होती. पतीला अर्धांगवायू झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आली असताना एका परिचित महिलेने धोक्याने या व्यवसायात ढकलले. येथून बाहेर निघणे शक्य नसल्यामुळे मन घट्ट करून काम करावे लागले. मात्र आता माझा मुलगा अभियंता झाला असून आयुष्यात आलेली हीच सुखाची झुळूक आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

अधिवेशन काळात मागणीत वाढयावेळी मिळालेली आणखी एक माहिती तर आणखी धक्कादायक होती. शहरात अधिवेशन काळात ‘सेक्सवर्कर्स’च्या मागणीत जास्त वाढ होते आणि याच कालावधीत नवीन मुली जास्त प्रमाणात आणल्या जातात, अशी माहिती एका महिलेने दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा