शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मेयो ओपीडीतील रुग्णांची संख्या निम्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:57 IST

कोरोनाच्या उपचारामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो इस्पितळ) सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मात्र मेयोमध्ये येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत कोरोनामुळे बरीच घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मेयोमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झाली आहे.

ठळक मुद्देदर महिन्याला ३० हजार रुग्ण : कोरोनाच्या धास्तीमुळे रुग्णांनी दाखविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो इस्पितळ) सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मात्र मेयोमध्ये येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत कोरोनामुळे बरीच घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मेयोमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झाली आहे. २०२० मध्ये दर महिन्याला सरासरी ३० हजार रुग्णच मेयोमध्ये पोहोचले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मेयो इस्पितळाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत मेयोमधील बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागात किती रुग्ण पोहोचले, कोरोनाचे किती रुग्ण होते, कोरोनाग्रस्तांसाठी किती रक्कम खर्च झाली व औषधांचा खर्च किती होता इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१९ साली मेयोतील बाह्यरुग्ण विभागात ७ लाख २७ हजार ८७ रुग्ण आले व दर महिन्याची सरासरी ही ६० हजार ५९० रुग्ण इतकी होती. तर २०२० मध्ये दर महिन्याची रुग्णांची सरासरी ही २९ हजार २४५ इतकी होती.२०१९ मध्ये मेयोमध्ये २ हजार २५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर जानेवारी ते आॅगस्ट २०२० या कालावधीतील ही संख्या १ हजार ४६६ इतकी होती.कोरोनाच्या १२ टक्के रुग्णांचा मृत्यूमेयोमध्ये ३० ऑगस्टपर्यंत ३ हजार ७१४ कोरोनाबाधित दाखल झाले. त्यात १,४२८ महिला व १९० पुरुषांचा समावेश होता. बाधितांपैकी २,४५५ जणांना सुटी झाली तर ४५३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची ही टक्केवारी १२ टक्के इतकी आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)