नागपूर : कोरोना संसर्गाचा या ११ महिन्यात सोमवारी विदर्भात बाधितांची संख्या तीन लाखावर गेली. आज २३०८ नव्या रुग्णांची भर पडली तर १७ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या ३००१२५ झाली. नागपूर जिल्ह्यात आज ७१० रुग्ण व ८ मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १४३१३३ तर मृत्यूची संख्या ४२८३ झाली. अमरावती जिल्ह्यात ६७३ नवे रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३०१९७ तर मृत्यूची संख्या ४६५ झाली. या दोन जिल्ह्यानंतर बुलडाण्यात ३५०, यवतमाळमध्ये २१० तर अकोल्यात २०६ नवे रुग्ण आढळून आले.
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर ७१० १४३१३३ ०८
भंडारा १५ १३५१२ ००
वर्धा ४५ ११३६७ ०३
गोंदिया १४ १४३३९ ००
गडचिरोली ०९ ९४६८ ००
चंद्रपूर १४ २३३८२ ०१
अमरावती ६७३ ३०१९७ ०२
अकोला २०६ १४१४१ ०२
यवतमाळ २१० १६२५५ ०१
बुलडाणा ३५० १६४९६ ००
वाशिम ६२ ७८३५ ००