शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आता मिळणार चष्म्यापासून मुक्ती

By admin | Updated: March 31, 2017 02:57 IST

लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल,

मेडिकलमध्ये आले चार कोटींचे ‘लॅसिक लेझर’ : भारतातील पहिले अद्ययावत उपकरणनागपूर : लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल, जाड चष्माच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल अशा सर्वांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करण्यासाठी ‘लॅसिक लेझर’ उपकरण महत्त्वाचे ठरते. राज्यात हे उपकरण केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. आता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) हे उपकरण उपलब्ध झाल्याने अनेकांना चष्म्यापासून मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे, देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या या उपकरणांपेक्षा कित्येक पटीने अद्ययावत असलेले हे पहिले उपकरण ठरले आहे. ‘लोकमत’ने ६ मार्च २०१६ रोजी ‘लालफितीत अडकले ‘लॅसिक लेझर’ उपकरण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेऊन त्याचा पाठपुरावा केल्याने अखेर गुरुवारी हे उपकरण मेडिकलमध्ये दाखल झाले. चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्म्याशिवाय सर्व गोष्टी अंधुक अंधुक दिसतात. एखाद्यावेळी चष्मा कधी चुकून विसरल्यावर किंवा फुटल्यावर नवा चष्मा तयार होईपर्यंत होणारा खोळंबा हा देखील मनस्ताप देणारा ठरतो. यावर ‘लॅसिक लेझर’ उपकरणाद्वारे लेझर शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते. लहान वयापासून ते अगदी पन्नाशी पार केलेल्यांच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करून चष्म्यापासून मुक्ती मिळवता येते. पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आयुष्यात पुढे कधीही चष्मा लावण्याची गरज पडत नाही. याशिवाय सकाळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुपारी रुग्णाला रुग्णायलातून सुटीही देण्यात येते. राज्यात ही उपचारपद्धत केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. सामान्यांना येथे जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परडवणारे नसल्याने या उपकरणासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी पुढाकार घेतला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याचा पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आॅगस्ट २०१६ रोजी ‘इनोव्हेशन टेक्नालॉजी’ या विशेष निधीतून हे उपकरण खरेदीसाठी तत्काळ चार कोटी रुपये दिले. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची दखल घेतली. परंतु निधी असताना व नोव्हेंबर महिन्यात निविदा निघाल्या असतानाही लालफितीत खरेदी प्रक्रिया अडकली. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. अखेर हे उपकरण रुग्णालयात दाखल झाले.(प्रतिनिधी)आठ हजारात होणार शस्त्रक्रियाखासगी रुग्णालयात ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात आहे. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परडवणारा नाही. यामुळे अनेक रुग्ण मेडिकलमध्ये या शस्त्रक्रियेची विचारपूस करायचे. आता हे उपकरण उपलब्ध झाल्याने लवकरच शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र ही ‘कॉस्मेटीक’ शस्त्रक्रिया असल्याने रुग्णाला साधारण आठ हजार शुल्क मोजावे लागणार आहे. १५ ते २० दिवसांत शस्त्रक्रियेला सुरुवात होईलचष्म्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे उपकरण फारच महत्त्वाचे ठरणार आहे. नेत्र रोग विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात हे उपकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साधारण १५-२० दिवसांत हे उपकरण रुग्णसेवेत असेल. -डॉ. अशोक मदानविभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल