शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता पाण्यासाठी जिल्ह्यांमध्ये वाॅर, जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर आवश्यक

By आनंद डेकाटे | Updated: June 7, 2025 17:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विदर्भ पाणी परिषदेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे वाॅर सुरू झालेलं आहे. ऑपरेशन सिंदुरच्या वेळी आपल्या पंतप्रधानांनी सिंधु जल करार मागे घेण्याचा निर्णय घेताच पाकिस्तान जगभरात मदत मागू लागला. इतके त्या पाण्याचे महत्त्व आहे. पाण्यासाठी आता देशांदेशांत किंवा राज्या-राज्यांमध्येच नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये वाॅर सुरू झाले आहेत. नाशिक, नगर व मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये असे वाॅर पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर होय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. आमदार डॉ. परिणय फुके,प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमनी पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी एक टक्के पाण्यावर संपूर्ण जग व जीवन चाललेल आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ कारणच पाणी होते. सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. आता सिंचनाची बरीच कामे झाली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगले शास्त्रोक्त परिणाम दिसून येत आहेत. ज्या गावात जलयुक्त शिवारची कामे झाली त्या गावातील पाण्याची पातळी वर आली असून दुष्काळाचा धोका कमी झाला आहे.

नदी-नाले ओढे प्रदूषित झाले आहेत. यात १० टक्के वाटा उद्योगांचा असला तरी ९० टक्के वाटा आपल्या सर्वांचा आहे. याचा परिणाम शेतीसह सर्वांवरच होत आहे. पाण्याचा पुर्नवापर आणि जलधारण ही काळाची गरज आहे. ते जाणीवपूर्वक केले नाही तर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. 

वैनगंगा-नळगंगा सह पाच नदीजोड प्रकल्पवैनगंगा-नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे चित्र बदलवणारा ठरणार आहे. यासोबतच राज्य सरकारने पाच नवीन नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच तापी जलपुनर्भरण योजनेबाबत मध्यप्रदेश सरकारसोबत करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २० ते २२ टिएमसी पाणी अमरावती विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे, या प्रकल्पातून महाराष्ट्र जल स्वयंपूर्ण कसा होईल, याचा संपूर्ण रोडमॅपच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला.

जलदूत निर्माण करणार - कुलगुरू डाॅ. खोडेपाण्याच्या योग्य वापराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून जलदूत निर्माण करणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाई