शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘टास्क फोर्स’ची प्रतीक्षा

By admin | Updated: September 18, 2015 02:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त झाली आहेत. नव्या विद्यापीठ कायद्याच्या पार्श्वभूमीवर ...

नागपूर विद्यापीठ : प्राधिकरणांऐवजी पर्यायी व्यवस्थानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त झाली आहेत. नव्या विद्यापीठ कायद्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभर निवडणुका होणार नसल्यामुळे प्रशासनाच्याच हातीच विद्यापीठाची संपूर्ण धुरा आहे. परंतु प्राधिकरणांशिवाय कामकाज चालविणे अवघड जाणार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे. या ‘टास्क फोर्स’च्या स्थापनेच्या हालचाली कधी सुरू होतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ आॅगस्टनंतर प्राधिकरण सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पद्धतीने वर्षभर भरण्यात येऊ नयेत, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असताना प्राधिकरणांना मुदतवाढ मिळालेली नाही. मात्र विद्यापीठाचे कामकाज प्राधिकरणांशिवाय चालविणे ही कठीण बाब आहे. त्यामुळेच प्राधिकरणांचे काम करण्यासाठी विद्यापीठात ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. या ‘टास्क फोर्सह्णद्वारे विद्यापीठातील विविध निर्णय घेण्यात येतील. यात प्रामुख्याने वित्त, अभ्यासक्रम, परीक्षा यांच्याशी संबंधित मुद्यांवर भर देण्यात येईल.(प्रतिनिधी)‘टास्क फोर्स’मध्ये असणार कोण?विद्यापीठाचे काम सुरळीत चालावे यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘टास्क फोर्स’मध्ये विषयाचे तज्ज्ञ, विद्यापीठाचे अधिकारी तसेच विविध विभागप्रमुखांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. ‘टास्क फोर्सह्णच्या माध्यमातून विद्यार्थी व विद्यापीठाच्या विकास आणि हिताचे निर्णय घेण्यावर भर राहील, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.