शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

आता वापरा वैदिक विटा आणि प्लास्टर; होईल घराच्या बांधकाम खर्चात बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:48 IST

भारतीय प्राचीन विज्ञानशास्त्राच्या भात्यातून उदयास आलेल्या वैदिक प्लास्टरचा बांधकामासाठी स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. या शुद्ध देशी बांधकामाच्या शैलीचा उपयोग शहराच्या अनेक ठिकाणी केला जात आहे.

ठळक मुद्देपाणी, वेळेची होते बचतआयुर्वेदाच्या सानिध्यातले आरोग्यवर्धक जीवन

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात बांधकाम साहित्यांच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. त्यामुळे, अनेक बांधकामे अर्ध्यावरच रखडले आहेत. अशा स्थितीत भारतीय प्राचीन विज्ञानशास्त्राच्या भात्यातून उदयास आलेल्या वैदिक प्लास्टरचा बांधकामासाठी स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. या शुद्ध देशी बांधकामाच्या शैलीचा उपयोग शहराच्या अनेक ठिकाणी केला जात आहे.

सर्वसामान्यत: घराचे बांधकाम करताना विटा, रेती, गिट्टी, सिमेंट आणि लोहा यांचा वापर होतो. आजच्या घडीला विटा, रेती, सिमेंट व गिट्टी यांचे दर दुपटीवर पोहोचले आहेत. त्यातही घर बांधल्यावर त्यावर सिमेंटचे प्लास्टर चढवणे, पुट्टी चढवून त्यावर रंगरंगोटी करणे या प्रक्रिया असतात. या सगळ्यांचा विचार केल्यास आजच्या घडीला एक दहा बाय दहाची खोली बांधतो म्हटले की मजूरांचा खर्च धरता साधारणत: सव्वा ते दीड लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च येतो. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी आणि वेळही लागतो. मात्र, प्राचीन भारतीय तंत्राने विकसित करण्यात आलेल्या वैदिक प्लास्टरचा खर्च बराच कमी आणि पाणी व वेळेची बचत करणारा पर्याय ठरत आहे.

वैदिक विटा आणि प्लास्टर आणि लोहा यातून हा खर्च अर्ध्यावर यायला लागला आहे. शिवाय, केवळ प्लास्टर भिजविण्यासाठी लागणारे पाणी वगळता पाण्याचा अपव्ययही टाळता येत आहे. त्यामुळे, खोली तयार झाली की लागलीच तेथे वहिवाट करण्यास सुरुवात करता येत आहे. शिवाय या प्लास्टरमध्ये आयुर्वेदिक घटक असल्याने अशा खोलीमध्ये किंवा घरामध्ये वावरणाऱ्या कुटूंबीयांचे आरोग्यवर्धनही होत असल्याचा दावा याचे निर्माते करत आहेत. देशी गाईचे शेण, जिप्सम, गावरानी गोंद, चिकन माती, निंबाचा रस किंवा भुकटी याच्या मिश्रणातून हे प्लास्टर व विटा तयार होत असल्याने घराच्या तापमानातही २० अंश डिग्री पर्यंतचे तापमान कमी होते. जमिनीवर वैदिक टाईल्स लावल्याने सामान्य टाईल्समुळे वाताचे आणि अंगदुखीचे होणारे त्रासही नष्ट होत असल्याचा दावा यातून केला जात आहे.किमतीमध्ये बरीच तफावतआजच्या घडीला कोणत्याही कंपनीची लाल वीट ५ ते ७ रुपये आणि अ‍ॅश वीट ४ ते ६ रुपये दराने उपलब्ध होत आहे. त्यातुलनेत वैदिक वीट ३.५० ते ४ रुपये प्रति वीट दराने उपलब्ध होते. शिवाय सिमेंटची एक बॅग ३५० रुपये (५० किलो) दराने तर वैदिक प्लास्टरची बॅग ३२५ रुपये (२५ किलो) दराने उपलब्ध होते. सिमेंटचा वापर करताना रेतीचा उपयोग अनिवार्य आहे आणि रेती आजच्या घडीला ३२ हजार रुपये डोजर आहे. वैदिक प्लास्टरमध्ये रेतीची गरजच नसते. यावरून बांधकामच्या किमतीत बरीच तफावत दिसून येते.फायदे दिसले की लोक विचार करायला लागतात - परिक्षित बोपर्डीकरसध्या सगळ्यांपुढे परंपरागत बांधकाम शैलीच असल्याने, वैदिक बांधकाम पद्धतीवरचा विश्वास बसायला वेळ लागेल. मात्र, ज्यांनी प्रयोग म्हणून याचा विचार केला त्यांना त्याचे फायदेही जाणवायला लागले आहेत. नागपुरात महाल, नंदनवन येथे वैदिक बांधकामासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे बघून इतरही घेत आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील काही खोल्यांचे काम याचेच आहे तर विहिरगाव येथे तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या गोरक्षण मध्ये वैदिक प्लास्टरच्या माध्यमातूनच बांधकाम सुरू असल्याचे बांधकाम कंत्राटदार परिक्षित बोपर्डीकर यांनी लोकमतला सांगितले. 

 

टॅग्स :environmentपर्यावरण