शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

आता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:19 IST

लम्पी स्किन डिसीजनंतर आता महाराष्ट्रातील जनावरांना क्रायमिन काँगोचा धोका वाढला आहे. गुजरातमधील जनावरांना या आजाराची लागण झाली असून हा जनावरांपासून माणसांना होणारा हा आजार महाराष्ट्रात येऊ नये यासाठी नाक्यांवर तपासणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लम्पी स्किन डिसीजनंतर आता महाराष्ट्रातील जनावरांना क्रायमिन काँगोचा धोका वाढला आहे. गुजरातमधील जनावरांना या आजाराची लागण झाली असून हा जनावरांपासून माणसांना होणारा हा आजार महाराष्ट्रात येऊ नये यासाठी नाक्यांवर तपासणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांसह सर्वच ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्तालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.जनावरांपासून थेट माणसांना होणारा हा आजार आहे. पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या पत्रामध्ये या आजारामुळे ९ ते ३० टक्के व्यक्तींच्या मृत्यूचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, कांगो, इराण, बल्गेरिया आदी देशांमध्ये जनावरांपासून माणसांना झालेला हा आजार आढळला होता. अद्याप महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झालेला नसला तरी खबरदारीच्या सर्वतोपरी सूचना पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना आणि पशुवैद्यकांना दिल्या आहेत.हा आजार झुनोटिक स्वरूपाचा असून नैरो व्हायरस विषाणूपासून पसरतो. हायलोमा जातीच्या गोचिडापासून जनावरे संक्रमित होतात. या जनावरांचा चावा घेतलेले गोचीड, डास तसेच पिसवा माणसांना चावल्यास माणसे संक्रमित होतात. नागरिकांनी कच्चे मांस, कच्चे दूध खाणे टाळावे. तसेच गोठे स्वच्छ करून गोचीड व कीटकांचे निर्मूलन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. गुजरातच्या सीमेवरील नाशिक, नंदुरबार, धुळे, पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. आंतरराज्य तपासणी नाक्यांवर जनावरांची तपासणी केली जात आहे.

ही आहेत लक्षणेहा आजार झालेल्या रुग्णाला तीव्र डोकेदुखी होते. जास्त प्रमाणात ताप येतो. सांधेदुखी, पोटदुखी आणि उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. आजारी व्यक्तीचे डोळे लाल होतात. घशामध्ये आणि तोंडामध्ये लाल ठिपके पडतात. आजार बळावल्यास त्वचेखाली व नाकातून रक्तस्राव होतो. लघवीवाटेदेखील रक्तस्राव होतो. काही व्यक्तींमध्ये काविळासारखी लक्षणेदेखील आढळतात.सुरक्षिततेसाठी उपायया आजारावर अद्याप कसलीही लस उपलब्ध नाही. आजार पसरू नये यासाठी जंतूचे वाहक असलेले गोचीड, पिसवा, डास यांचे निर्मूलन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिल्या आहेत. गोठ्याची नियमित फवारणी, गोचीड, डास आणि पिसवांचे निर्मूलन करणे, ते चावणार नाही याची दक्षता घेणे, तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड हाताने न फोडणे अशा सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी घ्यावी काळजीगाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या प्रकारच्या प्राण्यांच्या माध्यमातून माणसांना होणारा हा आजार आहे. या जनावरांच्या थेट संपर्कात येणाऱ्यांनी काळजी घ्यावी. कत्तलखान्यात काम करणाऱ्यांनी तसेच जनावरांच्या डॉक्टरांनीदेखील रक्ताच्या माध्यमातून जंतुसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. लसीकरणासाठी वापरलेल्या सुया, सिरीज, हॅण्डग्लोव्हज नष्ट करावे.गुजरातमध्ये आजाराची २०११ मध्ये नोंद२०११ मध्ये गुजरात राज्यात मनुष्यात या आजाराची प्रथम नोंद झालीे. या आजाराने तिथे तीन मृत्यू झाले होते. त्यानंतरही तुरळक स्वरुपात गुजरात व राजस्थानमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र, उद्रेक कुठेच झाल्याची नोंद नाही. देशात प्रामुख्याने गुजरातमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी केली असता अर्धा टक्के नागरिकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडीज आढळल्याची नोंद आहे.

डॉ. अनिल भिकाने, सहयोगी प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पदव्युत्तर संस्था, अकोलाजनावरांपासून माणसांना संक्रमित होणारा हा आजार आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्णांची नोंद नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता घेतली जात असून आंतरराज्यीय नाक्यांवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.- धनंजय परकाळे, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त, पुणे 

 

टॅग्स :Healthआरोग्य