शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

आता माघार नाहीच!

By admin | Updated: October 15, 2016 03:28 IST

नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन

मदन कुलकर्णी : उपेक्षित साहित्य प्रवाहांना संमेलनाच्या मंचावर आणण्याचा संकल्प नागपूर : नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ तिसराच उमेदवार घेईल. ते टाळण्यासाठी कुणीतरी एकाने माघार घ्यावी, असे कुणाला वाटत असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. याच भावनेतून मलाही दोन फोन आलेत. परंतु माझा निर्धार पक्का आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही, अशा ठाम शब्दात ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मदन कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली. शुक्रवारी ते विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. संमेलनाध्यक्षाचे विचार गांभीर्याने समाजापर्यंत पोहोचतात म्हणून मी ही निडणूक लढवित आहे. माझा अजेंडा खूपच स्पष्ट आहे. ग्रामीण, दलित व आदिवासी साहित्यामध्ये अनेक जण अतिशय ताकदीने लिहित आहेत. परंतु त्यांना अजूनही मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संधी मिळत नाही. ती मिळावी असा माझा प्रयत्न आहे. याशिवाय दिव्यांगांच्या क्षेत्रातही कसदार साहित्य निर्मिती होत आहे. परंतु तिकडेही साहित्य विश्वाचे लक्ष नाही. या सर्व उपेक्षित घटकांसोबतच मुख्य प्रवाहातील साहित्याला एक नवा विचार देता यावा हा माझा प्रयत्न आहे. हे संमेलन साधेपणाने व्हावे, या महामंडळाच्या भूमिकेचे मी समर्थन करतो. संमेलनाचा अध्यक्ष कुणीही होवो. त्याने महामंडळाकडून मिळणारा एक लाखाचा निधी भारतीय लष्कराच्या कल्याणार्थ द्यायला हवा आणि वर्षभर जी साहित्यविषयक भ्रमंती करायची आहे ती स्वखर्चाने करायला हवी, असे मला वाटते, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी) ...म्हणून लिफाफा बंद होता मी विदर्भ साहित्य संघाकडे जो लिफाफा सोपवला त्यात माझा उमेदवारी अर्जच होता. परंतु माझी उमेदवारी वैध ठरेपर्यंत माझे सूचक व अनुमोदक यांची नावे समोर यायला नको, असे मला वाटत होते. कारण, ती नावे समोर आली असती तर माध्यमांचे फोन त्यांना सुरू झाले असते. निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी उमेदवारी वैध असल्याचे जाहीर करेपर्यंत असा त्रास कुणाला होऊ नये, केवळ इतकाच हेतू होता. म्हणूनच मी बंद लिफाफा दिला व तो १० आॅक्टोबरपर्यंत उघडू नये, अशी सूचनाही विदर्भ साहित्य संघाला केली होती, असा खुलासाही यावेळी डॉ. मदन कुलकर्णी यांनी केला.