शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आता एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाचे ओझे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:47 IST

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकताच एक आदेश जारी करून एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद सातबारावर करणे अनिवार्य नाही, असे स्पष्ट केले. या आदेशामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेने पीक कर्ज मंजूर केल्यानंतर त्याचा बोजा सातबारावर नोंदवित नाही, तोपर्यंत बँक शेतकऱ्यांना त्या रकमेची उचल करण्यासाठी परवानगी देत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याचा शोध घेण्यापासून तहसील कार्यालयाचे खेटे घालण्यापर्यंतचा खटाटोप करावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकताच एक आदेश जारी करून एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद सातबारावर करणे अनिवार्य नाही, असे स्पष्ट केले. तशा सूचनाही त्यांनी महसूल विभाग व बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाने पीक कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा आणखी क्लिष्ट केली आहे.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी सातबारा कोरा असणे तसेच ते बँकेने मंजूर केल्यानंतर त्या कर्जाच्या रकमेची नोंद सातबारावर करणे अनिवार्य केले होते. सध्याच्या ‘आॅनलाईन’ पद्धतीमध्ये कोणताही फेरफार करण्यासाठी किमान १५ दिवसांची तांत्रिक अटही शासनाने घातली. ही सर्व कामे शेतकऱ्यांनाच करावी लागत असल्याने ऐन हंगामात त्यांना पैशासोबतच वेळही खर्ची घालवावा लागतो.या संपर्ण प्रकाराबाबत लोकमतमध्ये वारंवार वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तांमध्ये ‘आॅनलाईन’ सातबारासह अन्य तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला होता. तहसील कार्यालयातील सातबारा व्हेंडर मशीन व लिंक बंद असणे, हस्तलिखित सातबारा न स्वीकारणे, प्रसंगी तलाठी किंवा महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्याचा शोध घेत फिरणे यासह अन्य बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांमध्ये कराव्या लागल्या. त्यातून त्यांना मनस्तापही सहन करावा लागला.या सर्व बाबींची प्रशासनाने दखल घेत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जानी नोंद सातबारावर करणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करीत तसा आदेश संबंधित कार्यलयावर बँकांना पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी