शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आता विद्यार्थ्यांचीही ‘हायटेक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST

अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देहजेरी पुस्तकाऐवजी चक्क ‘बायोमेट्रिक’ प्रणाली : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर अशीही नजर

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरी पुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीही दाखविण्यात येते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चक्क ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा उपयोग सुरू केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात येत आहे.विदर्भातील अशाप्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.शिकवणी वर्गांमुळे अकरावी-बारावीदरम्यान विद्यार्थी महाविद्यालांमध्ये येऊन वर्गाला उपस्थिती लावत नाहीत. शिकवणी वर्गांशी ‘लिंक’ असलेल्या अनेक महाविद्यालयांत तर त्यांना तशी सूटच देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. शिक्षण उपसंचालक कार्यालायाकडून विद्यार्थ्यांच्या हजेरीसंदर्भात यंदा काही महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आल्या होत्या. शिवाय वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो व महाविद्यालयांचे महत्त्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.वरील बाबी लक्षात घेऊन हुडकेश्वर येथील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.यासाठी महाविद्यालयाने तीन ‘बायोमेट्रिक मशीन’ लावल्या असून शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथे ‘पंचिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्यापद्धतीचे ओळखपत्रदेखील त्यांना बनवून देण्यात आले आहेत. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यकच आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध रहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे यांनी सांगितले.बाहेरील राज्यांत आहे प्रणालीमहाराष्ट्रात मुंबईमधील मोजक्या महाविद्यालयांत हजेरीची ही प्रणाली दिसून येते. तर बाहेरील राज्यांमध्येदेखील काही ठिकाणी ही प्रणाली राबविण्यात येते. उत्तर प्रदेश शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला होता. राजस्थान, कर्नाटक या राज्यांतदेखील काही ठिकाणी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात आले होते.महाविद्यालयांनी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाशिकवणी वर्गांची ‘क्रेझ’ इतकी वाढली आहे की कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व संपण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडूनदेखील या बाबीला गंभीरतेने घेण्यात येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे उपस्थिती नोंद व्हावी, तसेच गैरप्रकार नियंत्रणात यावे, यासाठी महाविद्यालयानी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची आवश्यकता आहे.