शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अपंग नव्हे दिव्यांग म्हणा; अधिसूचना निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली.

ठळक मुद्दे इंग्रजीत म्हणता येईल ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली. हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचे निर्देश केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने दिले आहे.राज्यात पूर्वी ‘अपंग’ या शब्दाएवजी अनेक सकारात्मक शब्दांचा वापर करण्याच्या सूचना आल्या होत्या. यात ‘सक्षम’, ‘सर्वत: सक्षम’ तर शासनातील लिपिकांनी ‘निशक्तजन’, अंधांना ‘दृिष्टबाधित’, ‘प्रज्ञाचक्षु’, ‘सूरदास’ असे वेगवेगळे विषेशण लावत होते. परंतु ५ जुलै रोजी निघालेल्या अधिसूचनावर आता केवळ हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचा सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे, मराठीत काय म्हणायचे याला घेऊन अद्यापही संभ्रम असला तरी, दरम्यानच्या काळात मराठीतही ‘दिव्यांग’ शब्दाचा वापर होऊ लागल्याने तूर्तास तरी यावर विशेष चर्चा नाही. मात्र, ‘दिव्यांग’ संबोधून त्यांचा विकास होणार नसल्याचे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.त्यांच्या मते, नावातील बदलांसोबतच, अपंगांना जी पूरक संसाधने शासकीय अनुदानाच्या आधारे कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास, शासकीय अस्थापनातील त्यांच्या नोकºयांचा अनुशेष प्रामाणिकपणे खºया अपंगांना देऊन भरून काढल्यास, अपंगांसाठीच्या विद्यमान योजनांची प्रामाणिक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास दिव्यांगाचा विकास होईल. संबंधित विभागाने याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

राज्यात दिव्यांग बांधव अधिकारांपासून वंचितदिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असलेतरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली. नऊ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.

टॅग्स :Governmentसरकार