शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

.. आता रात्रीअपरात्री पोलीस महिलांना घरापर्यंत सोडतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.

ठळक मुद्देसंकटात असाल तर१०० नंबर डायल करामहिला पोलीस येणार मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही एरियात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल, तर त्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर अथवा ०७१२२५६१२२२ यावर डायल केल्यास पोलीस तिच्या मदतीला धावून येतील आणि तिला सुखरुप घरी पोहचवतील.शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. अडचणीत असलेल्या महिलेने १०० नंबर डायल केल्यास कंट्रोल रुममध्ये तैनात ड्युटी अधिकारी अथवा कर्मचारी, ती महिला उपस्थित असलेली जागा व संपर्क नंबरची मागणी करेल. त्यानंतर नियंत्रण कक्षातून ती महिला कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, ते लक्षात घेऊन त्या ठाण्यात संपर्क करून माहिती देण्यात येईल. त्या ठाण्यातील दोन महिला कर्मचारी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून मदत करेल. त्या महिलेला घरी पोहचवून दिल्यानंतर कंट्रोल रुमला रिपोर्ट सुद्धा देईल. यासंदर्भात सोमवारी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच पोलीस स्टेशनला निर्देश दिले आहे. सोबतच ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीत असलेल्या महिलेला सुखरुप घरी पोहचवून देण्याची ताकीदही दिली आहे. पोलीस आयुक्तांचे पत्र पोहचल्यानंतर बहुतांश ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीही केली आहे.

मदत मागितल्यानंतर घरापर्यंत सोडणार पोलीसपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, रात्री ९ नंतर एकट्या महिलेला वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. त्यांना पोलीस घरापर्यंत सुरक्षित पोहचविणार. त्यासाठी सर्वच ठाण्याला आवश्यक निर्देश दिले आहे.

 सोशल मीडियावर व्हायरल नंबरवर विश्वास ठेवू नकाहैदराबाद येथील घटनेनंतर सोशल मीडियावर महिलांच्या मदतीसाठी काही मोबाईल नंबर संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे. मदत मागणाºयाच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून संबंधित वाहनावर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता, कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अडचणीत असलेल्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षातच संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस