शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता पाँझी योजनांमध्ये लोकांची फसवणूक थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 10:36 IST

कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे फसवणुकीवर निर्बंध येणारकठोर शिक्षेची तरतूद

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे. नव्या वटहुकूमान्वये अशा योजना सुरू करणाऱ्यांना १ ते १० वर्षे शिक्षा आणि अशा व्यक्तीश २ लाख ते ५० कोटींपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पाँझी योजना राबविणाऱ्यांवर आळा बसणार आहे. पण लोकांनाही जागृत होऊन फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

पाँझी योजना म्हणजे कायगुंतवणूक केलेल्या रकमेचे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राबविण्यात येणाऱ्या योजनांना पाँझी योजना म्हणतात. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास बाध्य करण्यात येते. तशी जाहिरातही कंपनीच्या संचालकांतर्फे प्रकाशित करण्यात येते किंवा मौखिक प्रसिद्धी करून लोकांना योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची लालूच दाखविण्यात येते. या सर्व योजनांमध्ये परताव्याची साखळी बंद झाल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट परतावाच नव्हे तर साधे मुद्दलही मिळत नाही. अखेर कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्यानंतर गुंतवणूकदारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते.नागपुरात पाच हजार कोटींपेक्षा अधिक फसवणूकनागपुरात गेल्या काही वर्षांत अनेक ठगबाजांनी राबविलेल्या पाँझी योजनांच्या माध्यमातून लोकांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे. प्रमोद अग्रवाल यांनी लोकांना जमिनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करीत दोन वर्षांत रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी गुंतवणुकदारांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक केली आहे.श्रीसूर्या समूहाचे समीर जोशी, वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे प्रशांत वासनकर, सात्त्विक इन्व्हेंस्टमेंटचे अमोल ढाके, रविराज इन्व्हेस्टमेंटचे राजेश जोशी, हरिभाऊ मंचलवार, प्रवीण झामरे यांनी हजारो गुुंतवणूकदारांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मुद्दलही लोकांना मिळालेले नाही. उपरोक्त सर्व संचालकांपैकी काही कारागृहात तर काही फरार आहेत. काहींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शहरात अनेकजण पाँझी योजना चालवित असून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात न आल्यामुळे अनेक घोटाळे अजूनही उजेडात आले नाहीत.

लोकांमध्ये जनजागृतीची गरजपाँझी योजनांपासून दूर राहण्यासाठी लोकांमध्येही जनजागृतीची गरज आहे. देशात मोठ्या कंपन्यांनी केलेले घोटाळे सर्वांना ज्ञात आहेत. राष्ट्रीयकृत वा सहकारी बँका लोकांना गुंतविलेली रक्कम १० वर्षांत दुप्पट देत असेल तर खासगी कंपन्या दोन वा तीन वर्षांत रक्कम दुप्पट कशी देते, याचा खोलात जाऊन विचार करण्याची गुंतवणूकदारांना गरज आहे. आयुष्याची कमाई आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.

लोकांनी बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यातराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. गुंतवणूकदार पाँझी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवतील आणि अल्प कालावधीत दुप्पट व तिप्पट रक्कम देणाºया योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून वाचतील. छोट्या गुंतवणूकदारांना वटहुकूमामुळे फायदा झाला आहे. वटहुकूमात काही बाबी स्पष्ट नसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. सरकारने त्यात स्पष्टता आणावी.- सीए अनिल पारख.

टॅग्स :fraudधोकेबाजी