शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आता फिरते वीज बिल भरणा केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:38 IST

वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीस विदर्भातील २८ गावांसह राज्यातील ५० गावांतून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्ती निश्चित केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा नवीन उपक्रम : ग्रामीण भागात देणार सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीस विदर्भातील २८ गावांसह राज्यातील ५० गावांतून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्ती निश्चित केल्या जाणार आहे.साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार असून या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या गावांमधील साप्ताहिक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून या फिरत्या वीज भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक, प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबतच जनतेला याबाबत माहिती मिळण्यासाठी उद्घोषणा करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. दुर्मीळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावांसोबतच वीज भरणा केंद्राची सोय उपलब्ध नसलेल्या गावांचीही या सुविधेसाठी निवड करण्यात आली असून दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बील भरणा केंद्र असलेल्या गावांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वीज बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांचाही यात विचार करण्यात येत आहे. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविल्या जाणार आहे.सध्या अकोला जिल्ह्यातील कापसी आणि अडेगाव, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा, हिरडाव आणि आसलगाव जामोद, वाशिम जिल्ह्यातील मोप, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव मंगूल दत्तगिर आणि राजूरा बाजार, यवतमाळ जिल्ह्यातील मुकुदमन, शेंभलपिंपरी आणि अकोला बाजार, चंद्रपूर जिल्ह्यातील देव्हाडा, घुग्गूस आणि शेगाव, गडचिरोली जिल्ह्यातील घोट आणि कोटगाव, भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि बारवा, गोंदिया जिल्ह्यातील साखरी टोला आणि फुलसुर, नागपूर जिल्ह्यातील तेलगाव, भिलगाव, येरखेडा आणि पारशिवनी तर वर्धा जिल्ह्यातील काजूमवरग्राम, पोहरा आणि गौल या गावांचा समावेश असून, लवकरच ही सुविधा येथील गावकऱ्यांसाठी महावितरणतर्फे सुरू करण्यात येत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल