शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता सरकारनेच खासगी हॉस्पिटल चालवावेत! : रजिस्ट्रेशन प्रती केल्या जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:08 IST

खासगी कोविड हॉस्पिटल्ससाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजे दर लादले आहेत. या दरात इस्पितळांमध्ये सेवा देणे परवडणारे नाही. दरांमध्ये सुधारणा व काही बाबतीत सवलती द्याव्यात म्हणून ‘आयएमए’ने शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, योग्य प्रतिसाद न देता १ सप्टेंबरला नवे एकतर्फी दर राज्य शासनाने जाहीर केलेत. याचा निषेध करीत सरकारनेच आता आमचे हॉस्पिटल चालवावे, असे आवाहन ‘आयएमएने’ करत मंगळवारी सदस्यांनी आपल्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यालयात जमा केल्या.

ठळक मुद्देअधिसूचना विरोधात आयएमएचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कोविड हॉस्पिटल्ससाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजे दर लादले आहेत. या दरात इस्पितळांमध्ये सेवा देणे परवडणारे नाही. दरांमध्ये सुधारणा व काही बाबतीत सवलती द्याव्यात म्हणून ‘आयएमए’ने शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, योग्य प्रतिसाद न देता १ सप्टेंबरला नवे एकतर्फी दर राज्य शासनाने जाहीर केलेत. याचा निषेध करीत सरकारनेच आता आमचे हॉस्पिटल चालवावे, असे आवाहन ‘आयएमएने’ करत मंगळवारी सदस्यांनी आपल्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यालयात जमा केल्या.राज्य ‘आयएमए’ने आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्वच पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची १२ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृ ती समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेतला आहे. येत्या सात दिवसात जर सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, असा इशाराही दिला आहे. ‘आयएमए’चे पॅट्रन डॉ. अशोक अढाव, नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, राज्यातील २५ हजार छोटी रुग्णालये या अन्यायकारक दरांच्या ओझ्याखाली दबून गेली आहेत. ती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हे दर वाढवण्यासाठी तीन दिवसात एक बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. परंतु त्या बाबतीत कुठलेही उत्तर मिळाले नाही. यामुळे आयएमएने आंदोलन उभे केले आहे. मंगळवारी सर्व हॉस्पिटल्सची नोंदणीपत्रके जमा केली. यामुळे आता राज्य शासनानेच आमचे हॉस्पिटल ताब्यात घ्यावे आणि त्याच दरात ते चालवून दाखवावे, असेही आवाहन केले.या आहेत मागण्या-हॉस्पिटल्सना न परवडणारे दर व कायद्याच्या धमक्या देऊ नका.-आयएमएसोबत चर्चा करून हॉस्पिटल्सना परवडणारे नवे दर जाहीर करा.-कोविड हॉस्पिटल्सप्रमाणे नॉन-कोविड हॉस्पिटल्सला ऑडिटर पाठवून दडपशाही करू नका.-डॉक्टरांना प्रमाणित दर्जाचे पीपीई किट्स, मास्क माफक दरामध्ये उपलब्ध करा. या वस्तू शुल्क नियंत्रणाखाली आणा.- डॉक्टरांना समाजकंटकांच्या हल्ल्यापासून संरक्षण द्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये योग्य कायद्याची कलमे लावण्यासाठी पोलिसांना आदेश द्या.-सतत कायद्याच्या धमक्या देऊन डॉक्टरांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊ नका.-डॉक्टरांची अवास्तव मानहानी बंद करा.-महात्मा फुले जनारोग्य योजनेतील सहा महिन्यांची थकबाकी द्या.-राज्यपालांनी आदेश दिलेल्या आयएमएसोबतच्या राज्य आणि जिल्हा समन्वय समितीच्या बैठका बोलवा.-खासगी डॉक्टरांच्या ५० लाखांच्या विम्याचे आश्वासन लाल फितीतून सोडवा.-कोविडशी लढताना शहीद झालेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र राज्यातर्फे मरणोत्तर सन्मानित करा.

टॅग्स :agitationआंदोलनdoctorडॉक्टर