शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यात ‘शिवशाही’ने जा, तुम्हाला आवडेल तिथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 10:05 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाप्रासंगिक करारावरही होणार उपलब्ध

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे.आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेनुसार सात दिवस आणि चार दिवसांचा पास काढून प्रवाशांना वातानुकूलित बसने प्रवास करता येणार आहे. या योजनेंतर्गत पास काढून प्रवाशांना शिवशाही आसनी बसने प्रवास करता येणार असून शिवशाही शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही. या योजनेत गर्दीचा हंगाम १५ आॅक्टोबर ते १४ जून आणि कमी गर्दीचा हंगाम १५ जून ते १४ आॅक्टोबर या दोन कालावधींसाठी राहणार आहे. यात प्रौढ आणि मुले यांच्यासाठी दोन वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत. शिवशाही आसनी बससाठी गर्दीच्या हंगामात सात दिवसांच्या पासचे मूल्य प्रौढांसाठी १७८० रुपये, मुलांसाठी ८९० रुपये, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १६४५, मुलांसाठी ८२५ रुपये राहील. शिवशाही आसनी बस चार दिवसांच्या पाससाठी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १०२० रुपये, मुलांसाठी ५१०, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी ९४०, मुलांसाठी ४७० रुपये राहील.तर शिवशाही आंतरराज्य मार्गासाठी सात दिवसांच्या पासचे गर्दीच्या हंगामासाठी मूल्य प्रौढांसाठी १९२० रुपये, मुलांसाठी ९६० रुपये, तर कमी गर्दीच्या हंगामासाठी प्रौढांसाठी १७८० रुपये, मुलांसाठी ८९० रुपये राहील.चार दिवसांच्या पासचे मूल्य गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी ११०० रुपये, मुलांसाठी ५५० रुपये, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १०२०, मुलांसाठी ५१० रुपये राहील. ज्या मार्गावर शिवशाही वातानुकूलित बससेवा नाही त्या ठिकाणी निम्न दर्जाच्या बससेवेसाठी साधी, जलद, रात्रसेवा, मिडीबस, निम आराम बसमध्ये ही पास वैध राहणार आहे.आंतरराज्य मार्गावरील पास महाराष्ट्रात वैध राहणार आहे. शिवशाही बसेस मागणीनुसार प्रासंगिक करारावर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम असे वेगळे दर ठेवण्यात आलेले नाहीत. प्रवाशांनी पुणे, भंडारा, अमरावती, यवतमाळ या मार्गावर सुरू असलेल्या शिवशाही वातानुकूलित बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी केले आहे.

टॅग्स :Travelप्रवास