शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:51 IST

बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देएअरलाईन्सची आर्थिक तंगी दूर करण्यासाठी व्यवस्थानागपुरातून जम्बो जेटसुद्धा उडणार

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे. देशातून यावर्षी हज यात्रेला जाणारे विमान हाजींना जेद्दाह व मदिना सोडून रिकामे परत येणार नाही. या विमानांचा परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये समावेश करण्यात येईल. देशात पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात येत आहे. त्याचा फायदा एअर इंडियाला होणार आहे.एअर इंडिया यावर्षी हज यात्रेसाठी बार वाईड बॉडी जम्बो जेट ७४७ चा समावेश करणार आहे. यावर्षी एअर इंडियाला हज यात्रेतून उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हज यात्रा विमान कंपन्यांसाठी एक संधी आहे. या कालावधीत लाखोच्या संख्येने लोक विदेश प्रवास करतात. विशेष म्हणजे या प्रवासाचे भाडे प्रवास सुरू होण्यापूर्वीच जमा होते. उल्लेखनीय म्हणजे सौदी हज टर्मिनलशी झालेल्या करारानुसार शेड्यूल्ड फ्लाईट आॅपरेट करता येऊ शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत भारतातून हज यात्रेकरूंना सोडल्यानंतर विमान रिकामे परतत होते. त्यामुळे विमान कंपन्यांचे नुकसान होत होते. परंतु यावर्षी सरकारतर्फे सौदी अरबमधून शेड्यूल्ड फ्लाईट चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या मते, सौदी अरबच्या विमान कोट्याच्या आधारे ही व्यवस्था करण्यात येऊ शकते.नागपुरातून हजचे ३४० क्षमतेचे पहिले विमान २५ जुलैला उडणार आहे, तर शेवटचे विमान ३१ जुलैला उडणार आहे. तर २६ ते २९ जुलैदरम्यान १८० व ३२० क्षमतेचे विमान उडणार आहे.

विमानाच्या मेंटेनन्सला आला वेगहज यात्रेसाठी नागपूर एम्बार्केशन पॉर्इंटवरून यावर्षी २५ जुलैला प्रवास सुरू होईल. ३१ जुलैला शेवटचे विमान उडेल. नागपुरातून मोठ्या प्रमाणात हज यात्री प्रवास करीत असल्याने एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. (एआयईएसएल) च्या कार्याला वेग आला आहे. हजसाठी उडणाऱ्या विमानांच्या मेंटेनन्सला प्राथमिकता देण्यात येत आहे.

आमचे प्रयत्न सुरू आहेयावर्षी एअर इंडियाचे भारतातून हजसाठी उडणारे विमान सौदीवरून परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये त्याचा समावेश व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत हजची फ्लाईट चार्टर फ्लाईटच्या रूपात होती. यावर्षी भारतातून हजसाठी दोन बोर्इंग ७७७, दोन जम्बो जेट ७४७, तीन बोर्इंग ७८७ व एअरबस ३२० सुद्धा सोडण्यात येईल.-एच.आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल, नागपूर

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया