शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लाईट बिल भरताय? महत्वाची अपडेट! आता पाच हजारापर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:08 IST

पाच हजारावरील वीज बिल रोखीने भरण्यास निर्बंध : ऑनलाईन’ पद्धतीचा करावा लागणार वापर

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज बिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यावरील रकमेच्या वीज बिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असून त्यानंतर कुठल्याही वीज ग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाईन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही करु शकतो. हीर पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाईन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायांद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २०७७ च्या तरतुदी असल्याने पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सुचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण