शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 11:19 IST

बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयंदा एकतर्फी चित्र नाहीचपाचही उमेदवारांनी प्रतिष्ठा लावली पणाला

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र अशी त्रिकोणी लढत होत आहे. निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.या मत विभाजनाचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी पाचही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून जिथे डॅमेजची प्रबळ शक्यता आहे तिथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. किशोर सानप विदर्भाचे, राजन खान व रवींद्र गुर्जर पश्चिम महाराष्ट्राचे तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुण्यातूनही अर्ज भरला असला तरी ते मराठवाड्याचेच उमेदवार आहेत, हे उघड सत्य आहे. संभाव्य मत विभाजनाचा धोका लक्षात घेता विदर्भातून एकच उमेदवार या निवडणुकीला उभा रहावा, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण, दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व दोघांचेही साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळ सारखे असल्याने येथे मत विभाजन अटळ आहे. अगदी सारखी स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही आहे. राजन खान, लक्ष्मीकांत देशमुख व रवींद्र गुर्जर हे तिघेही उमेदवार पुण्यातच राहणारे आहेत. पुणेकरांसोबत मुंबईकर मतदारांचा ओढाही आपल्या जवळचा उमेदवार म्हणून पुण्यातील उमेदवारांकडे आहे. राजन खान व लक्ष्मीकांत देशमुख यांच्या मित्र परिवाराचे परीघही जवळपास सारखे आहे. याचा अर्थ येथेही विभाजन टाळता येणे कठीण आहे.लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे मराठवाड्यातील असल्याने तेथील संपूर्ण मते त्यांनाच मिळतील, असेही अजिबात नाही. राजन खान, डॉ. शोभणे व डॉ. सानप या तिघांच्याही चाहत्यांचा कमी-अधिक गोतावळा मराठवाड्यात असल्याने येथेही मते विभागली जाणार आहेत. हे चित्र बघता विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल असा अंदाज आहे.या वास्तवाची जाणीव पाचही उमेदवारांना असल्याने मागच्या वर्षीसारख्या एकतर्फी विजयाची आशा सगळ्यांनीच सोडून दिली आहे.बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर मदारमहाराष्ट्रात जिथे जिथे विभाजनाचा फटका बसेल त्या ठिकाणची संभाव्य हानी भरून काढण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील अपेक्षित मते मिळाली नाही तर किमान बृहन्महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मते तरी आपल्याकडे वळवता यावी, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांना साकडे घातले जात आहे. परंतु बृहन्महाराष्ट्रातसुद्धा यातील प्रमुख तीनही उमेदवारांचा कमी-अधिक प्रभाव असल्याने येथील मतांचा प्रवाहही एकाच दिशेने वळेल, याची अजिबात शक्यता नाही. याचा अर्थ महाराष्ट्राप्रमाणेच बृहन्महाराष्ट्रातही वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये मते विभागली जाणार असून उमेदवाराच्या विजयामध्ये मत विभाजनाचा फॅक्टर येथेही महत्त्वाचा ठरणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्य