शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘आयव्हीआर प्रणाली’द्वारे बाधितांशी थेट संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:55 IST

नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला मिळावा. यासाठी मनपा ‘इंटरेक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स’ (आय.व्ही.आर.) प्रणाली वापरणार आहे. याव्दारे आता विलगीकरणातील बाधितांशी थेट संपर्क साधला जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला मिळावा. यासाठी मनपा ‘इंटरेक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स’ (आय.व्ही.आर.) प्रणाली वापरणार आहे. याव्दारे आता विलगीकरणातील बाधितांशी थेट संपर्क साधला जाईल.यासंदर्भात मनपाने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरातील कोरोना रुग्णांना आयव्हीआर पध्दतीच्या माध्यमाने दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल. शहरात दररोज ५०० च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. या सर्वांशी व्यक्तिगतरित्या दूरध्वनीव्दारे संपर्क करणे अवघड आहे. यावर उपाय म्हणून आयव्हीआर माध्यमातून संपर्क केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून आपल्या प्रकृतीची माहिती द्यावी लागेल. प्रकृती खालावलेली आढळल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील.यासंबंधी आयुक्त राधाकृष्णन बी. आणि स्टेप वन कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोविड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.या सेवेचा गृह विलगीकरण मध्ये राहणाऱ्या कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील, असे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले.लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये राहण्यात अनुमती आहे. रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येते. गृह विलगीकरणातील रुग्णांकरिता ही सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.प्रणालीचे असे आहेत फायदेविलगीकरणातील रुग्णांशी थेट संपर्करुग्ण स्वत:च आपल्या प्रकृतीची काळजी घेऊ शकतील.प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर उपचाराला मदत करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर