शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपुरातील शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’, अर्ध्या तासात होणार ऑनलाईन तक्रार

By योगेश पांडे | Updated: August 8, 2024 21:00 IST

नागपूर पोलिसांचा पुढाकार : पोलीस-विद्यार्थ्यांमधील दुवा बनणार ‘क्लब’चे सदस्य.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात सायबर फसवणूक व इतर गुन्हयांचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: महाविद्यालयांती विद्यार्थी-विद्यार्थिनी लवकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहे. हीच बाब लक्षात घेऊन टीनएजर्स व तरुणाईत सायबर जागृती निर्माण व्हावी तसेच गुन्हा झाल्यास त्यांना लगेच मदत मिळावी यासाठी शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’ची स्थापना करण्यात येणार आहे. नागपूर पोलिसांकडून हा पुढाकार घेण्यात आला असून रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून याच गुरुवारी सुरुवात झाली.पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून या ‘सायबर क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे.

प्रत्येक शाळा - महाविद्यालयात असा क्लब स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या क्लबमध्ये शिक्षक व विद्यार्थी सदस्य असतील. त्यात विद्यार्थिनींचादेखील समावेश असेल. त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर अलर्टनेस निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. तसेच कुणासोबत सायबर फ्रॉड झाला तर पोलिसांशी संपर्क करून अर्ध्या तासात ऑनलाईन तक्रार दाखल होण्याबाबत पावले उचलण्यात येतील. गुरुवारच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सायबर क्लबच्या सदस्य डॉ.रश्मी वेलेकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपायुक्त निमीत गोयल यांनी सायबर गुन्हेगार कसे जाळयात ओढतात व गुन्हे करण्याची पध्दती तसेच गुन्हे कसे होतात, यावर प्रकाश टाकला. प्रा.राकेश कडून यांनी आभार मानले. वेदांत नायडू व वराध्या कुळकर्णी यांनी संचालन केले.

असा असेल शाळा-महाविद्यालयांतील सायबर क्लब- क्लबमध्ये मुलींचा समावेष अनिवार्य असेल.- क्लबच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सायबर जागृतीवर भर.- महाविदयालयात कोणत्याही विदयार्थ्यासोबत सायबर गुन्हा घडल्यास विदयार्थी क्लब सदस्याशी संपर्क करतील.- क्लबचे सदस्य पिडीताचा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करवून देतील.- प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील सायबर अधिकारी या सायबर क्लब्सचे देखरेख अधिकारी असतील.- पिडीत विदयार्थ्याची तक्रार प्राप्त झाल्यावर ती तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर दाखल करून संबंधिताला ऑनलाईन प्रत देण्यात येईल.- सायबर तक्रारीचे स्वरूप पाहुन नमुद तक्रार सायबर पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात येईल

टॅग्स :nagpurनागपूर